August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

मेहकर शहरात १० जुलाई ते १२ जुलाई पर्यंत ३ दिवस जनता कर्फ्यू*

*मेहकर शहरात १० जुलाई ते १२ जुलाई पर्यंत ३ दिवस जनता कर्फ्यू*

व्यापारी असो. चा निर्णय

प्रतिनिधि-मेहकर

मेहकर शहरात कोरोना चा वाढता संसर्ग पाहता कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी मेहकर शहरातील व्यापारी असो. ने मेहकर शहरात दिनांक १०जुलाई शुक्रवार पासून १२ जुलाई रविवार पर्यंत ३ दिवस जनता कर्फ्यू लावन्याचे आव्हान केले आहे.
या सबंधीची व्यापारी असो,प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची एक बैठक स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉल मध्ये पार पडली या बैठकीस जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव,आमदार डॉ. संजय रायमुलकर,
उपविभागीय अधिकारी गणेश राठोड़, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप तड़वी,ठानेदार आत्माराम प्रधान,नगर परिषद मुख्याधिकारी सचिन गाड़े इत्यादी उपस्थित होते.सदर बैठकीत किराणा असो, कृषी केंद्र संचालक असो, सराफा असो, कपड़ा व्यापारी असो, मेडिकल असो, तसेच छोटे व्यापारी असो चे पदाधिकारी उपस्थित होते या वेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर सावधानता बाळगण्यासाठी व मेहकर शहरात कोरोना ची संसर्ग चैन तोडण्यासाठी सर्वसहमति ने ३ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेऊन कडकडित जनता कर्फ्यू ठेवण्याचे आव्हान खासदार प्रतापराव जाधव यांनी केले या आवहानाला उपस्थित सर्व व्यापारी बांधवांनी प्रतिसाद देत शहर कोरोना मुक्त करण्यासाठी ३ दिवस म्हणजेच १०,११,१२,जुलाई रोजी जनता कर्फ्यू पाळन्याचे मान्य केले या जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रतिष्ठानें उघडल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!