Home विदर्भ वीज वितरण विभागाचे आणखी 5 कर्मचारी कोरोनाबधित…!

वीज वितरण विभागाचे आणखी 5 कर्मचारी कोरोनाबधित…!

124

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – चक्रीवादळामुळे कोकणात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करून परत आलेले वीज वितरण विभागाचे आणखी 5 कर्मचारी आज कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यात 3 कर्मचारी हिंगणघाट तर दोन देवळी तालुक्यातील आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोकणात चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी 20 कर्मचारी वर्धा जिल्ह्यातून गेले होते. परतल्यानंतर त्यातील 3 कर्माचारी काल कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील आज प्राप्त 12 अहवालात 5 व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्या आहेत. तर 2 नेगेटिव्ह आणि 5 अहवाल इनकनक्लुसिव्ह आहेत. यामध्ये 3 कर्मचारी हिंगणघाट मधील असून एक पुलगाव आणि एक विजयगोपाल येथील आहे. हिंगणघाट मधील बाधित कर्मचाऱ्यांना सेवाग्राम रुग्णालयात तर देवळी मधील रुग्णांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.