Home विदर्भ नामदार बच्चू कडू राज्यमंत्री महाराष्ट्र् शाशन यांचा वाढदिवसानिमित्य दारोडा येथे केले 51...

नामदार बच्चू कडू राज्यमंत्री महाराष्ट्र् शाशन यांचा वाढदिवसानिमित्य दारोडा येथे केले 51 रक्तदात्यांनी रक्तदान व 51 वृक्षाचे वृक्षारोपण

133

प्रमोद झिले

वर्धा / येरला – दिनांक 5 जुलै ला हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू (जलसंपदा,शालेय शिक्षण, कामगार, महिला व बालकल्याण राज्यमंत्री) यांचा वाढदिवासानिमित्य रक्तदानाचा व वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडला या शिबिरात नामदार बच्चूभाऊ कडू यांचा 51 व्या

वाढदिवासानिमित्य 51 रक्तदान केले तसेच 51 कडुनिंब व वड व पिलल या वृक्षांचे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी दारोडा शाखेचे शाखाप्रमुख विजय पडोळे,आकाश देवढे, भोजराज नेहारे, अमोल पडोळे,सतीश गलांडे,महेंद्र बोरकर,नितीन केसुरकर, राम पोले,शुभम वाढई, मनोज ,प्रमोद झिले, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.