Home बुलडाणा गुरुवर्य अल्हाज असद बाबा यांचा असाम बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे डॉक्टर उपाधी...

गुरुवर्य अल्हाज असद बाबा यांचा असाम बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे डॉक्टर उपाधी ने गौरव

391

*गुरुवर्य अल्हाज असद बाबा यांचा असाम बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे डॉक्टर उपाधी ने गौरव*

जाकीर शेख

सिंदखेडराजा:- जे का रंजले गांजले ,त्यांसी म्हणे जो आपुले, तो ची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा !आई जिजाऊ ची पुण्य नगरी सिंदखेड राजा येथील नामांकित आणि राष्ट्रीय एकता आणि सर्व धर्म समभाव चे प्रणेते, विदर्भरत्न, विश्व शांती राजदूत प. पु.गुरुवर्य श्री अल्हाज असद बाबा यांना आसाम बुक ऑफ रेकॉर्ड ने त्यांच्या चाळीस वर्षाच्या अखंडित मानव सेवेसाठी डॉक्टर उपाधी ने गौरविले आहे. आसाम बुक रेकॉर्ड चे संस्थापक मंजित शर्मा यांनी हा गौरव दिलेला आहे.
अल्हाज असद बाबा हे गेल्या चाळीस वर्षांपासून अखंडीत पणे
राष्ट्रीय एकता आणि सर्वधर्म समभाव चे कार्य करीत आहे. समाजामध्ये शांतता, समता, बंधुता नांदावी म्हणून सर्व समाजातील लोकांनां एकत्र आणून शांततेचा आणि प्रेमाचा संदेश ते देतात. महाराष्ट्र राज्यातील संत परंपरेचा विचार तरुणांच्या प्रत्यक्ष व्यक्तिगत आचरणात आणून तरुणांमध्ये देशभक्ती, मानवता, धर्मनिरपेक्षता,समता निर्माण करून नवतरुण पिढीस आपली सामाजिक जबाबदारी ची जाणीव ठेऊन असद बाबा नेहमी योग्य मार्गदर्शन करत असतात.
व्यक्ती, कुटुंब, ग्राम अशा चढत्या क्रमाने बंधू भावाचा विकास व्हावा आणि त्यातून समाज जीवनात समतेची प्रस्थापना व्हावी यासाठी अल्हज असद बाबा यांनी विचारला कृतीची जोड दिली. हज़रत गौस ए आजम दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था चे माध्यमातून मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे काम सुरू केले. राष्ट्रीय एकता, रुग्ण सेवा,अस्पृश्यता निवारण, अनिष्ट रूढी उच्चाटन, शिक्षण प्रसार, आरोग्य संवर्धन, वनीकरण, संस्कार क्षमता, महिला जागृति, बेटी पढ़ाओ बेटी बचाव हे कामाचे आयाम हाती घेत ते कार्य करत आहे.
सर्व धर्म समभाव हा या संत परंपरेचा आत्मा राहिला आहे. ईश्वर आणि भक्त वेगवेगळे नाहीत तर एकच आहे असे संत संतांनी आग्रहाने सांगितलेले आहे. मानवसेवा हीच ईश्वर सेवा असून असद बाबा यांनी वैयक्तिक पातळीवरच्या भक्ती परंपरेला सेवेची जोड देत ती सामूहिक पातळीवर आणली. संतांनी सांगितलेल्या उपदेश कालानुरूप मांडत बाबांनी प्रबोधन आणि सेवाभक्तीची चळवळ नव्या स्वरूपात मांडली. लाखो दीन दुबळ्या लोकांची सेवा बाबांनी निःस्वार्थ पणे केली आहे आणि करत आहे. कर्करोग रुग्ण आणि किडनी रोग रुग्णांसाठी सिंदखेड राजा मध्ये दरवर्षी मोफत महा आरोग्य कॅन्सर तपासणी तथा उपचार मार्गदर्शन शिबिर बाबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित केले जाते. त्यामध्ये नामांकित तज्ञ डॉक्टर ज्यांची तीन तीन महिने भेटी साठी नंबर लावावा लागतो असे तज्ञ सिंदखेड राजा मध्ये येऊन आपली सेवा देतात.मागील सहा वर्ष मध्ये जवळपास पस्तीस हजार रुग्णां ना याचा फायदा झालेला आहे. लवकरच सिंदखेड राजा मध्ये मोफत कॅन्सर तपासणी आणि संशोधन उपचार केंद्र तथा कर्करोग उपशामक आणि सहाय्यक काळजी विभाग केंद्र ची स्थापना करणार असल्याचा मानस बाबांनी केला आहे. ज्यामुळे विदर्भ मराठवाडा तील दीन दुबळ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
आपल्या या जागतिक कार्यासाठी त्यांना नुकताच वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड ने त्यांच्या थोर कार्यासाठी गौरविले आहे. इंडोनेशिया शांतता मंचने वर्ल्ड पिस अंबेसीडर ,तथा सौदनेस सांस्कृतिक पुरस्कार देऊन पुरस्कृत केले आहे , डायनॅमिक पिस रेस्क्यू मिशन इंटरनेशनल संस्था नायजेरिया सरकार पुरस्कृत डिप्लोमा ऑफ एक्सैलेन्स फॉर हुमानिटी अँड पीस या पदवी ने गौरविले आहे. यापूर्वी असद बाबांना “महात्मा गांधी लीडरशीप पुरस्कार” लंडन येथे देण्यात आला.तसेच महाराष्ट्र संयुक्त राष्ट्र संघटना ने देखील त्यांना गौरविले आहे. असद बाबा यांना यापूर्वी ही राज्यस्तरीय,राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे.
महाराष्ट्र शासन तथा भारत सरकार ने सुद्धा असद बाबांच्या या महान सर्वधर्म समभाव आणि रुग्ण सेवा कार्याची दखल घेऊन बाबांना पुरस्कृत करावे अशी सर्व धर्मीय लाखो भाविकांनी ईच्छा व्यक्त केली आहे.

Previous articleगुरुपौर्णिमा निमित्त टायगर ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण
Next article
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.