Home जळगाव नगरसेविका योजनाताई पाटील व खान्देश वधु वर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित...

नगरसेविका योजनाताई पाटील व खान्देश वधु वर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाने विना हुंडा आदर्श विवाह संपन्न

383

शरीफ शेख रावेर

चि. कुणाल व चि सौ का यांचा विना हुंडा विवाह समजाला आदर्श

जळगाव – दि. 28 जून 2020 रोजी खानदेश वधुवर ग्रुपच्या माध्यमातून व संथापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील व सामाजिक कार्यकर्त्या व भडगाव नगरपालिका नगरसेविका योजना ताई पाटील यांच्या सहयोगाने

चि.कुणाल (विक्कीदादा)
मा.श्री.भैय्यासाहेब राजेंद्रराव भास्करराव भोसले (बँक अधिकारी धुळे)
रा.आमडदे ह.मु.धुळे यांचे सुपुत्र

कु.जया (देवयानी)
मा.श्री.जिभाऊसो.रमेश नारायणराव पाटील

रा.धमाणे ह.मु.आमदे ता.पानसेमल जि.बड़वानी (म.प्र.) यांची सुकन्या
यांचा हा आदर्श विवाह घरगुती वातावरणात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितित कोरोना पार्श्वभूमीवर शासन नियमानुसार सोशल डिस्टनस ठेऊन उत्साहात संपन्न झाला.
या विवाह संबधातील विशेष बाब म्हणजे हुंडा प्रथा समाजातून नष्ट झाली पाहिजे या हुंडाच्या मुले अनेक मुलींच्या जीवनात कटू प्रसंग उदभवले आहेत त्याचा नाहक त्रास त्या परिवारांना सहन करावा लागतो या आदर्श विवाहाचे व वधु- वराचे आदर्श मातापिता यांचे शिवअभिनंदन उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींच्या वतीने श्री डीडी पाटील सर यांनी केले. व वर-वधूंना उत्तम आरोग्य , यश , प्रगतीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छारूपी शुभ आशीर्वाद दिलेत या विवाहाचे समाजासह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे..