Home विदर्भ अन् थांबला पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा.

अन् थांबला पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा.

159

*आरिफ पोपटे*

कारंजा लाड : राज्याचे गृह राज्यमंत्री तथा वाशीम जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई वाशीम येथील कार्यक्रम आटोपुन कोरोना प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी करण्यासाठी कारंजा येथे आले असता नागपूर औरंगाबाद हायवेवर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप भोजराज व जिल्हा काँग्रेस सचिव राजाभाऊ डोणगावकर हे कार्यकर्त्यांसह पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची वाट पाहत उभे होते. अन् एवढ्यातच पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा सुसाट वेगाने येऊन थांबला आणि पालक मंत्री श्री.देसाई यांनी त्यांचेशी चर्चा केली.यावेळी सोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे होते. गृहराज्य मंत्री व वाशीम जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे २९ जून रोजी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास कारंजा येथे आगमन झाले. हायवेवर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप भोजराज, जिल्हा काँग्रेसचे सचिव राजाभाऊ डोणगावकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश पाटील लांडकर, प्रदीप वानखडे,सचिन पाटील, सुदर्शन बेलसरे,आदी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे स्वागत केले. दौरा कार्यक्रमात उल्लेख नसलेल्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी अशा पद्धतीने हायवेवर थांबणे म्हणजे हे एक विषेशच म्हणावे लागेल.