आध्यात्मिक

पंढरपूर वारी करिता भाविक मंडळी रवाना….

देवानंद खिरकर अकोट:=

आज श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने विदर्भातील भाविक मंडळी यांचे प्रस्थान झालेले आहे.सकाळी सहा वाजता कौंडण्यपूर रुक्मिणी माता मंदिरामध्ये आईंच्या पादुकांचा अभिषेक भैया साहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.त्यानंतर पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्या हस्ते पादुकांचे पूजन आणि प्रस्थान करण्यात आले.अल्पशा भाविकांच्या उपस्थितीत दिंडीचे प्रस्थान भजनाच्या निनादात पार पडले.आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरातुन आआधी अंबिका माता मंदिरामध्ये आई रुक्मिणी मातेच्या पादुका नेण्यात आल्या. व तिथे ह.भ.प. पानसे महाराज यांनी पूजन केले.पालखी सोहळा मध्ये संस्थानचे व्यवस्थापक आकाश ठाकरे, पतसंस्थांचे पदाधिकारी आणि ह भ प गणेश महाराज शेटे ,संजय महाराज ठाकरे, वासुदेव महाराज महल्ले, राम महाराज गव्हारे, अशोक महाराज ऊरकुडे ,सरजेराव देशमुख व संस्थानचे विश्वस्त श्री अतुल भाऊ ठाकरे,संस्थांचे उपाध्यक्ष श्री वसंतरावजी डाहे,रवींद्र चव्हाण,आकाश ठाकरे व तहसीलदार वैभवजी फरताळे साहेब यांच्या सोबत 20 वारकरी विठाई बसने पंढरपूर कडे प्रस्थान केलेले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

आध्यात्मिक

आषाढी एकादशी ला मुख्यमंत्र्या सोबत हे करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा , ?

अमीन शाह यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपुरात होणाऱ्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पुजेचा मान असणाऱ्या मानाच्या वारकऱ्याची ...
महत्वाची बातमी

विश्ववारकरी सेनेने दिलेला उपोषणाचा इशारा मागे…

विदर्भातील वारकर्यांना परवाणगी नाकारल्याने दिला होता उपोषणाचा इशारा….. देवानंद खिरकर := संपुर्ण देशात सुरु असलेल्या ...
महाराष्ट्र

सावता फुले व्यायामशाळा व योगेश्वरी माता मित्र मंडळा कडून हनुमान जयंती साजरी

नंदूरबार प्रतिनिधी जीवन महाजन नंदूरबार येथील माळीवाडा परिसरात सावता फुले प्रेरित व्यायाम शाळा व योगेश्वरी ...
आध्यात्मिक

पाच दशकांच्या इतिहास जपत आहे नारायणपूर येथील भागवत सप्ताह…!

वर्धा / नारायणपूर १६ :- समुद्रपुर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे गेल्या बेचाळीस वर्षांपासून तुकाराम ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आध्यात्मिक

संत गजानन महाराज प्रकट दीनानिमित्त मुस्लिम समाजाने दिला माणुसकीचा परिचय

जमीयते उलेमा हिंदच्या वतीने भक्तकांच्या सेवेसाठी पुढाकार देवानंद खिरकर – अकोट ब्रम्हांडनायक संत गजानन महाराज ...