Home मुंबई ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावरील गुन्हा शासनाने त्वरित मागे घ्यावे...

ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावरील गुन्हा शासनाने त्वरित मागे घ्यावे – राष्ट्रीय वारकरी परिषद

161

मुंबई / पंढरपूर ( शाहरुख मुलाणी ) – ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावरील गुन्हा शासनाने त्वरित मागे घ्यावे अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषद च्या वतीने अध्यक्ष ह. भ. प. मारुती शास्त्रे तुणतुणे, उपाध्यक्ष ह. भ. प. कारभारी महाराज अंभोरे, कार्याध्यक्ष ह. भ. प. बापू महाराज रावकर यांच्या द्वारे करण्यात आली आहे.

धर्मग्रंथा मध्ये अनेक अशा गोष्टी आहे जे सध्याच्या विज्ञान वाद्यांना मान्य नाही असे संदर्भ फक्त हिंदूंच्या ग्रंथात आहे असे नाही. अनेक अन्य धर्मियांच्या ग्रंथात सुद्धा असे विषय आहे मात्र कुठल्याही अन्य धर्मियांच्या प्रचारका विरुद्ध कधीही गुन्हे दाखल होत नाही. यापुढे तुकोबाराय सदेह वैकुंठास गेले जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या असे सांगणाऱ्या कथा किर्तनकार यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात. त्या उपक्रमाची या अंनिस पुरोगामी मंडळींची ही पूर्व तयारीच आहे. या महाराष्ट्रात संत बालयोगी सदानंद महाराज यांचा जंगलातील आश्रम अतिक्रमण आहे म्हणून पाडण्यात आला. काही दिवसापूर्वी पालघर येथे साधूंची हत्या याच पोलिसांच्या समक्ष करण्यात आली. तबलीकी जमातीचे अवैध रित्या वास्तव्य करणारे विदेशी मौलवी याच नगर जिल्यात सापडले मात्र त्यांच्याविषयी ना प्रशासन कठोर कारवाई करतात ना अंनिस व पुरोगामी कारवाईची मागणी करतात. या देशात सैनिकांवर दगड फेकणाऱ्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले समाजवादी पक्षाने दंगलीतील अनेक गुन्हे मागे घेतले. मग महाराष्ट्रात किर्तनकार यांच्यावरील गुन्हा का मागे घेऊ नये हा प्रश्न सर्व वारकरी मंडळींना पडलेला आहे.

स्व. श्री बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमी वारकरी महाराज मंडळी यांना कायमच पाठिंबा असायचा स्वतः कायम भगवे वस्त्र परिधान करून त्यांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगला त्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात सुप्रसिद्ध कीर्तनकारांवर गुन्हा दाखल होणे दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे इंदोरीकर महाराजांनी बाळासाहेब यांच्या जयंती पुण्यतिथीचे कितीतरी किर्तने केलेली आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सरकारने त्यांच्यावरील गुन्हा त्वरित मागे घ्यावे अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषद चे अध्यक्ष ह. भ. प. मारुती शास्त्रे तुणतुणे, उपाध्यक्ष ह. भ. प. कारभारी महाराज अंभोरे, कार्याध्यक्ष ह. भ. प. बापू महाराज रावकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.