Home मुंबई उपनगरात वीजग्राहकांना ‘शॉक’ , बंद काळात दुप्पट, चौपट, दहापट बिले आमदार अतुल...

उपनगरात वीजग्राहकांना ‘शॉक’ , बंद काळात दुप्पट, चौपट, दहापट बिले आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात दिंडोशी अदानी कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर निषेध

181

प्रतिनिधी – रवि गवळी

मुंबई – उपनगरात लॉकडाऊनमध्ये अनेकांचे उत्पन्न बुडाले. घरगुती खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीमध्ये अदानीने वीजबिलवाढ केला आहे. गेल्या तीन महिन्यांचे बिल एकत्र दिले असून, एप्रिलपासून ही वाढ करण्यात आली आहे. वीजबिलात केलेली वाढ, वाढलेले बिल पाहून ग्राहकांना धक्काच बसला आहे.
अदानी कडून कोरोनामुळे मार्च ते मे या तीन महिन्यांचे मीटर तपासणी केली नाही. आता लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे तपासणी केली असून बिल वाटप केले जात आहे. तीन महिन्यांचे बिल एकत्र आले आहे. महिन्याला तीनशे रुपये बिल येणाऱ्यांना तीन महिन्यांचे दोन हजार बिल आले आहे. सरासरी बिल आकारणी केली जात असली तरी एप्रिलमध्ये वाढलेले वीज दरही बिल वाढीस कारण आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अशा स्थितीत दरवाढ केल्यामुळे ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सदर बाब स्थानिक कार्यसम्राट आमदार यांचा लक्ष्यात येताच त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली दिंडोशी येथील अदानी कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर निषेध केला.
मोर्चेत सहभागी उतर मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष अ‍ॅड सिद्धार्थ शर्मा नगर सेविका दक्षा पटेल ज्ञानमूर्ती शर्मा नगर सेविका संगीता शर्मा कार्यकर्ते ग्राहकांनासाठी काही मागण्या करण्यात आल्या

1. व्यावसायिक परिसर बिला मध्ये सुधारणा. २. निवासी परिसराची वाढीव बिले कमी करा
योग्य तपासणीनंतर वापरल्या जाणार्‍या युनिटवर बिल द्या . महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या कायद्याच्या चौकटीवर काम करा.
या चारही मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत व या कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिंडोशी शाखा अदानी कंपनीतर्फे एक समर्पित अधिकारी नेमा .
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून उद्योग बंद आहेत. आणि या बंद काळातच दुप्पट, चौपट, दसपट बिले महावितरणने वीज ग्राहकांना धाडली आहेत.

यापैकी अनेक बिलांमध्ये चुका व गोंधळ आहेत. त्यामुळे संबंधित सर्व ग्राहकांनी लेखी निषेध व तक्रार नोंद करून मगच ही बिले भरावीत, असे आवाहन स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केले अदानी कंपनीला भारतीय जनता पार्टी यांनी इशारा दिला बिलात लवकर सुधारणा करा , दाटवस्तीत बिल स्थगितांचे चे मीटर लाईट खंडित करू नये अन्यथा आम्ही आमच्या स्टाईल ने दणका देऊ