नांदेड

धक्कादायक” नांदेडात आज २४ तासात ३४ रुग्णांची भर, व नांदेड मधील आमदारासह परिवारातील ९ जण बाधित तर ५ रूग्ण बरे झाले

नांदेड , दि. २७ ( राजेश एन भांगे ) – कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 5 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 365 बाधितांपैकी एकूण 275 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत.

नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार 27 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 80 अहवालापैकी 62 अहवाल निगेटिव्ह तर 18 नवीन बाधित व्यक्ती आढळले आहेत

✔️त्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे :

नवीन बाधितांमध्ये विष्णुपुरी येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 62 वर्षाचा 1 पुरुष, बोरबन परिसरातील 55 वर्षाची 1 महिला, गोकुळनगर येथील 58 वर्षाची 1 महिला, बिलालनगर येथील 6 वर्षाची 1 मुलगी, नाथनगर येथील 22 वर्षाची 1 महिला, भगतसिंघ रोड येथील 52 वर्षाची 1 महिला, पिरबुऱ्हानगर येथील 19 व 20 वर्षाच्या 2 महिला व 3 वर्षाचा 1 बालक, उमरकॉलनी येथील 28 व 60 वर्षाच्या 2 महिला, लेबरकॉलनी येथील 34 वर्षाचा 1 पुरुष, देगलूरनाका शिवनगर नांदेड येथील 64 वर्षाची 1 महिला, नायगाव ताकबीड येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, गॅस गोडाऊन लोहा येथील 52 वर्षाची 1 महिला व 55 वर्षाचा 1 पुरुष आणि चंद्रभागानगर कंधार येथील 44 वर्षाच्या 1 महिलेचा यात समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.

⛔️सदरील रुग्णांमध्ये काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 18 व आजच्या अहवालामध्ये एक नवीन रुग्ण आढळून आलेला आहे.

शनिवार दिनांक 21 जून रोजी रात्री उशिरा 9 : 00 वाजता एकूण 46 अहवाल प्राप्त झाले त्यात नवीन 16 रुग्ण पॉसिटीव्ह आढळून आले आहेत.

✔️त्यांचा तपशील खालील खालील प्रमाण आहे :

⭕️गवळीपुरा एक पुरुष रुग्ण वय – 41

⭕️बळेगाव देगलूर, एक पुरुष रुग्ण वय – 21

⭕️चैतन्यनगर, एक पुरुष रुग्ण वय – 48

⭕️पिरबुऱ्हाण नगर एक 4 वर्षीय बालक

⭕️कुबा मज्जीद, सिडको तीन रुग्ण एक महिला दोन पुरुष वय – 43 व 24, 50

⭕️विष्णपुरी नांदेड 6 महिला रुग्ण वय – 5 बालिका, 29, 45, 25, 57, 50.

⭕️विष्णपुरी नांदेड 3 पुरुष रुग्ण वय – 6 वर्षीय बालक, 19 व 25 पुरुष.

जिल्ह्यात शनिवारी (ता.२७) सकाळी नांदेडचे एक आमदार तर रात्री नऊ वाजता आलेल्या अहवालात अन्य १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे, या १६ जणांमध्ये नांदेड आमदाराच्या कुटूंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. कोरोना बाधित माजी महापौर व त्यांचा नगरसेवक मुलगा यांच्या संपर्कात आल्यामुळे एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

✔️जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 365 बाधितांपैकी एकूण 275 व्यक्ती कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 16 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. औषधोपचार चालू असलेल्या 74 बाधितांपैकी 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय 50 व 55 वर्षाच्या दोन स्त्री व 38, 42, 67 व 75 वर्षाचे चार बाधित पुरुषांचा समावेश आहे. 3 बाधित रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 17 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ एकूण रुग्ण संख्या 365 वर.

☑️ दिवसभरात 5 रुग्णांना सुट्टी.

☑️ आत्तापर्यंत 275 बरे होऊन घरी .

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️ अत्ता पर्यंत एकूण 16 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️74 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️ 2 महिला 4 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक.

☑️ उपचारास्तव 2 रुग्ण औरंगाबाद 1 सोलापूर
येथे संदर्भीत.

✅️नांदेड आरोग्य विभागाचे महत्वाचे आवाहन!

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

नांदेड जिल्ह्यातील लोहा उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालयास शहीद सैनिक संभाजी कदम यांचे नाव द्या- शंभुसेना

नांदेड – जिल्ह्यातील मौजे जानापुरी येथील भुमीपुत्र शहीद सैनिक संभाजी कदम यांनी नगरोटा, जम्मू काश्मीर ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नांदेड

मानवाधिकार सुरक्षा संघ (ह्यूमन राईटस) नांदेड जिल्हा अध्यक्षपदी गणपत वानखेडे पाटील व जिल्हा सचिव पदी प्रशांत बारादे , राऊतखेडकर यांची नियुक्ती

नांदेड – मानवाधिकार सुरक्षा संघ (ह्यूमन राईटस) नांदेड जिल्हा अध्यक्षपदी गणपत सदाशिवराव वानखेडे पाटील व ...
नांदेड

किनवटमध्ये आज 5 बाधितांची भर, आता 25 रुग्ण घेताहेत उपचार ; 11 वर्षाचा मुलगा व 13 वर्षाची मुलगी निघाली पॉझिटिव्ह

मजहर शेख नांदेड / किनवट , दि. ०३:- किनवटमध्ये आज सोमवारी ( ता. तिन) सायंकाळी ...