Home जळगाव निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंक परिवारास व जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था...

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंक परिवारास व जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था जळगाव शहर परिवारास अभिमानाची बाब…!

191

जळगाव जिल्ह्यात स्त्रावाचे संकलन साठी धावणार मोबाइल स्वब वैन

जिल्हाअधिकारी श्री. अभिजीत राऊत सर यांच्या संकल्पने तुन निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान , फ़ूड बैंक चे निःस्वार्थ समाजसेवक व जय संघर्ष ग्रुप चे श्री. फारूक पटेल सर यांनी तयार केली मोबाईल स्वब वैन

जळगाव – जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा प्रभाव व कोरोना मुळे प्रत्येक माणसामध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी श्री.अभिजीत राऊत सर यांच्या सांगली पैटर्नच्या संकल्पने तुन जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक भागातील संशियताचे स्त्रावाचे नमूने जमा करण्यासाठी ” मोबाइल स्वब वैन” धावणार आहे.हे वाहन आरटीओ अधिकारांच्या मार्गदर्शनाखाली जय संघर्ष ग्रुपचे सचिव व निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फ़ूड बैंक चे निःस्वार्थ समाजसेवक श्री.फारूक पटेल सर यांनी तयार केली आहे. व या वाहनाद्वारे संशियताचे स्त्रावाचे नमूने जमा केले जातील हे वाहन घरोघरी जावून स्त्राव घेणार आहे. त्यामुळे रुग्णालयात जावून स्त्राव देण्याचा नागरिकांचा त्रास वाचनार आहे. शहरात याच प्रकारची जय संघर्ष संस्थेची दोन वाहने धावणार आहे, या वाहन मध्ये स्त्राव संकलनासाठी वाहना मध्ये एक डॉक्टर व टीम सोबत असणार आहे.
संस्थेचे फारुक पटेल यांनी विशेष मेहनत घेवून तयार केलेल्या या वाहनाची स्वतः जिल्हाअधिकारी साहेब व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. श्याम लोही सर यांनी पाहणी केली व कोरोना योद्धा म्हणून श्री. फारूक पटेल सर यांची निवड करण्यात आली आहे. असी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांनी दिली आहे .