Home परभणी एसटी आरक्षणात खोडा घालणाऱ्या कोरोनाचा सुफडासाफ गोपीचंद पडळकर नावाच सॅनीटायझर करेल –...

एसटी आरक्षणात खोडा घालणाऱ्या कोरोनाचा सुफडासाफ गोपीचंद पडळकर नावाच सॅनीटायझर करेल – सखाराम बोबडे पडेगावकर

65
0

गंगाखेड जी. परभणी – 70 वर्षे सत्तेत असूनही धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा एसटी आरक्षणाचा प्रश्न न सोडवता त्यात खोडा घालणाऱ्या कोरोनाचा सुपडा साफ करण्याचे काम गोपीचंद पडळकर नावाच सॅनीटायझर करेल असा विश्वास धनगर साम्राज्य सेनेचे चे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या पंढरपूर मधील पत्रकार परिषदेतील वक्तव्याच सखाराम बोबडे पडेगावकरां नी समर्थन केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी ज्यांना कोरोना संबोधले त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आत्मचिंतन करून पाहावं. स्वातंत्र्यापासून दऱ्याखोऱ्यात फिरणाऱ्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेल्या एसटी आरक्षणाचा मुद्दा गुंतागतीचा करण्याचं काम या कोरोना राजकारण्यांनी केलंय. स्वतःच्या स्वार्थासाठी या कोरोना रूपी राजकारण्यांनी महाराष्ट्रातील उपेक्षित समाजाच्या घरात घरात भांडण लावण्याचे काम केलं. महाराष्ट्रातल्या पाच-पन्नास कुटुंब व नातेवाईकांची प्रगती करणे म्हणजे राज्याची प्रगती असू शकत नाही. विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी बारामतीत जाऊन पवारांचं दुकान बंद करण्याची भाषा केली होती त्यामुळे पडळकर यांनी आज केलेलं विधान हे काय नवीन नाही आणि ते खरंच आहे .समाजाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही पडळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून अंगावर येणारास शिंगावर घेतल जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

Unlimited Reseller Hosting