येथील समस्त मुस्लिम समाज व भाविकांतर्फे देण्यात आले निवेदन.
रावेर (शरीफ शेख)
सुफी संत हजरत ख्वाजा मोइनोद्दीन चिशती र.अ. यांच्या विषयी अपशब्द बोलल्याबद्दल
रावेर तहसील व पोलिसात निषेदार्थ निवेदन देऊन कार्यवाही ची मांगणी करण्यात आली. दि १५ रोजी एक न्युज चॅनल च्या अँकर अमिश देवगन याने आपल्या डिबेट शो मध्ये अजमेर येथील सुफी संत हजरत ख्वाजा मोइनोद्दीन चिशती यांच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य केले.त्या बद्दल महाराष्ट्र ही नसून पूर्ण देशात समस्त मुस्लिम बांधव तसेच त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे भाविकांची धार्मिक भावना दुखावली.अजमेर येथील दर्गा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक मानले जात असून आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या कडून दरवर्षी या दरगेवर चादर चढविण्यात येते.तसेच इतर राज्याचे मुख्यमंत्री तसेच इतर नेत्यांचीही या दरगेवर श्राद्ध आहे.देशात कोरोना विषाणूने देश त्रस्त असून सुफी संत विषयी अपशब्द वापरून हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणे दुर्दैवी आहे.देशाला एकतेचे व जात धर्म विसरून देशहितासाठी कार्य करण्याची गरज असून या मध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या या अँकर विरोधात कठोर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रसंगी रावेर येथील समस्त मुस्लिम समाज व भविकांतर्फे रावेर तहसील मध्ये नायब तहसीलदार संजय तायडे व पोलीस स्टेशन चे सा.पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदना वर शेख अब्दूल आसीफ, शेख नसीरोदिन, शोएब शेख ,शेख अजहर , शेख मंजूर ,मोहम्मद जूनैद रजा, आकिबउदिन ,मूजाहिद खान, शाहिद खान,आदीचे सह्या आहेत.