Home विदर्भ इनरव्हिल क्लब यवतमाळ ज्वेल्स तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

इनरव्हिल क्लब यवतमाळ ज्वेल्स तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

179

यवतमाळ – सामाजिक क्षेत्रात अग्रेसर इनरव्हिल क्लब यवतमाळ ज्वेल्स च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्थानिक नेहरू स्टेडीयम येथे योग दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी योग प्रशिक्षिका सौ. वर्षा पडवे यांनी विविध प्रकारचे योगासना विषयी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच नियमित पणे योगासन केल्याने विविध प्रकारच्या आजारावर नियंत्रण होवुन बरे कसे होतात या विषयी मार्गदर्शन केले. योगासनामुळेही प्रतिकार शक्ती वाढते असा दावा वर्षा पडवे यांनी केला. याप्रसंगी इनरव्हिल क्लब यवतमाळ ज्वेल्स च्या अध्यक्षा रितु गायकवाड , सचिव दिशा निलावार , प्रकल्प अधिकारी प्रियंका बिडकर , आंतरराष्ट्रीय सेवा संघटिका प्रतिभा पवार ( मुळे ) , अश्‍विता वाढवे , प्रज्ञा नरवाडे , आदिंनी सहभाग नोंदवुन सोशल मिडीयाच्या माध्यमातून योगसनांचा प्रचार प्रसार केला.