Home सातारा मायणीच्या युवकाने दिले कासवाला जीवदान वनविभाग व नागरिकांकडून सागर मानेचे कौतुक…!

मायणीच्या युवकाने दिले कासवाला जीवदान वनविभाग व नागरिकांकडून सागर मानेचे कौतुक…!

32
0

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – ‘देव तरी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्येय मायणीच्या सागर उत्तम माने या युवकाला मिरज- भिगवण या महामार्गावर सापडलेल्या कासवाच्या बाबतीत आज आला. सापडलेल्या या युवकाने सदर कासवाला वनविभागाच्या मार्फ़त सुरक्षित ठिकाणी सोडले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असा, नेहमी प्रमाणे कातरखटाव येथून आपल्या येथे असलेला आपला हार्डवेअर चा व्यवसाय नेहमीप्रमाणे बंद करून सागर माने आपल्या दुचाकीवरून मायणीकडे येत असताना त्यांना धोंडेवाडी गावाच्या लगत असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरील रस्त्यावर येऊ पाहणारे कासव त्यांना आढळले . महामार्गावरून धावणारे मोठे ट्रक यामुळे ते मृत पावले असते परंतु सागर माने यांनी सदर कासवाला सदर कासव वाहनाखाली येऊ नये यासाठी कासवाला मायणी येथील वनविभागास सुपूर्त करण्याच्या उद्देशाने पत्रकार दत्ता कोळी व सतीश डोंगरे यांना याची माहिती दिली.
यावेळी त्यांनी तातडीने वनविभागाच्या वनरक्षक सौ संजीवनी खाडे यांना याबाबत माहिती देऊन त्यांनी सांगितल्या प्रमाणे सदर कासव वनविभागाचे कर्मचारी राजाराम माने यांच्या उपस्थितीत मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावात सोडण्यात आले .

वाहनाखाली येऊ पाहणाऱ्या कासवाला जीवदान दिल्याचे समाधान झाल्याचे मत सागर माने यांनी व्यक्त केले.”
या कार्यासाठी सागर मानेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे . यावेळी वनकर्मचारी राजाराम माने,सतीश डोंगरे,दत्ता कोळी, मल्हारी जाधव, सागर घाडगे,ग्रामपंचायत कर्मचारी सुरज खांडेकर,सुशांत सोनवणे उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting