Home मराठवाडा जनतेच्या रक्षणासाठी एक खरा योद्धा गेला जग सोडून..

जनतेच्या रक्षणासाठी एक खरा योद्धा गेला जग सोडून..

37
0

सर्वत्र दुःख…..

अमीन शाह

जालना – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जीवाची बाजी लावून कोरोनाशी लढा देणाऱ्या एका कोविड योद्ध्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण राखीव पोलीस बलावर शोककळा पसरली आहे. कोरोनाला झुंज देत असताना पोलीस उप निरीक्षक राजेंद्र गंगा सिंग राणा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जालना येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-3 चे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र गंगा सिंग राणा यांचं आज मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राणा हे आंतर सुरक्षा बंदोबस्त कामी मुंबई येथील सांताक्रूझ इथं फिक्स पॉईंट कोरोना बंदोबस्त तैनात होते.

जालना येथून 15 एप्रिल रोजी राज्य राखीव दलाची एक कंपनी मुंबईला कोरोना बंदोबस्तासाठी रवाना करण्यात आली होती. दरम्यान, यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण करून त्यांना निरोप दिला होता.
चिंताजनक बातमी, देशातली आतापर्यंतची कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर
दरम्यान, 4 जून रोजी सदर कंपनी आपला बंदोबस्त संपवून जालन्यात परतणार होते. मात्र, एक दिवस अगोदरच राणा यांच्यासह 6 जवानांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला. ज्यामुळे राणा यांच्यासह सहा जवानांना मुंबईच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बाकीच्या कर्मचाऱ्यांना जालन्याला परत पाठवण्यात आले होते.
गेल्या तीन दिवसांपासून राणा यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
राणा हे मूळ उत्तराखंडचे असून त्यांचे वडील देखील राज्य राखीव पोलीस दलातच कार्यरत असल्याने ते जालन्यातच स्थायिक झाले होते. राणा यांच्या निधनाच्या बातमीने जालना येथील संपूर्ण राज्य राखीव पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. राणा यांच्यापश्चात 2 मुले असून राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकांनी विशेष वाहनाने त्यांना मुंबईला रवाना केले.

Unlimited Reseller Hosting