Home महत्वाची बातमी शिवसेना वर्धापन दीनानिमित्य पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत 54 वटवृक्षांची लागवड

शिवसेना वर्धापन दीनानिमित्य पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत 54 वटवृक्षांची लागवड

137

जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण

यवतमाळ :- शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवसेना जिल्हा कार्यालयात यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री तसेच शिवसेना नेते संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. याव्यतिरीक्त ऑक्सीजन पार्क येथे वटवृक्षांची लागवड करुन वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रात 19 जुन 1966 रोजी शिवसेनेचा जन्म झाला. प्रबोधनकार ठाकरेंच्या उपस्थितीत काही मोजक्या सहकाऱ्यांसोबत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. सर्व काही मराठीसाठी आणि मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी या मूळ हेतूने जन्माला आलेल्या शिवसेनेने १९८० पासून हिंदुत्ववादाची भूमिका जाहीरपणे घ्यायला सुरुवात केली. ऐंशी टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या ध्येयधोरणानुसार आजही शिवसेनेचे कार्यकर्ते समाजकारणात व्यस्त राहतात. आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त समाजकारणाचा भाग म्हणून वृक्षारोपण करुन सामाजिक योगदान पुर्ण करण्यात आले. सकाळी 10 वाजता शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, नगराध्यक्षा कांचन चौधरी, प्रवीण पांडे, श्रीधर मोहोड, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, गजानन इंगोले, लताताई चंदेल, निर्मला विनकरे, सागरताई पुरी, कल्पना दरवई, राजेंद्र कोहरे, योगेश भांदक्कर, चेतन क्षीरसाठ, अशोक पुरी, अमोल धोपेकर प्रामुख्याने उपस्थित होते. ध्वजारोहना नंतर सर्व उपस्थित पदाधिका-यांनी शिवसेनेच्या ध्वजास मानवंदना दिली. जिल्हयात सुध्दा विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ऑक्सीजन पार्कमध्ये वृक्षारोपण

शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑक्सीजन पार्कमध्ये पालकमंत्री तथा वनमंत्री संजयभाऊ राठोड तसेच शिवसेनेच्या पदाधिका-यांनी 54 वटवृक्षांची लागवड केली. विशेष म्हणजे शिवसेनेचा वटवृक्ष वाढवण्यात योगदान असलेल्या राज्य पातळीवरील दिवंगत नेत्यांची तसेच जिल्हा पातळीवरील दिवंगत शिवसैनिकांची या सर्व वृक्षांना नावे देण्यात आली आहे. यामध्ये स्व. प्रबोधनकार ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, माँ साहेब ठाकरे, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, मधुकर सरपोतदार, प्रमोद नवलकर, शरद आचार्य, राजेश्वर रागीनवार, आनंद दिघे, सुभाष पारकर, थीम बहादूर थापा, विठ्ठल चव्हाण, भाई वर्तक, चंद्रकांत पडवळ, डॉ रमेश प्रभू, दादा कोंडके, अमरनाथ पाटील, संजय बंड, रमेश मोरे, दत्ता पुसदकर, हिंदुराव निंबाळकर, काका वडके, विजय लोके, कमलाकर जामसांडेकर, प्रकाश परांजपे, सतीश प्रधान त्याच बरोबर यवतमाळ जिल्ह्यातील प्रकाश चाळीसगावकर, लक्ष्मण किनकर, नरेंद्र कोल्हे, नाना ताजने, विनोद डेहणकर, परशु पारस्कर, मनोहर बापू देशमुख, डॉ ज्ञानेश्वर राऊत, उत्तम तायडे, दादू मिश्रा, व्यंकटराव मेटकर इत्यादींच्या नावांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सुध्दा उपस्थित होते.