महाराष्ट्र

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा ‘सेवा सप्ताह

विशेष – राजेश एन भांगे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे जगणे सुसह्य करण्यासाठी 19 ते 25 जून ‘सेवा सप्ताह’ आयोजित करणार आहे.
या सप्ताहअंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यु काँ. अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

गरजूंना ‘न्याय किट’ चे वाटप

लॉकडाऊन जरी अंशतः खुलला असला तरी रोजगार अद्याप पूर्णपणे सुरू झाला नसल्याने गरिबांची आणि विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाची उपासमार होत आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेत गरजूंसाठी अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या ‘न्याय किट’ चे वाटप करण्याचा कार्यक्रम
युवक काँग्रेसने हाती घेतला आहे.

मनरेगा योजनेचे जॉब कार्ड्स

कोरोनाच्या भीतीमुळे आणि रोजगार बंद पडल्यामुळे शहरी भागातील स्थलांतरित मजूर गावाकडे निघून गेले.गावीदेखील काम नसल्यामुळे या सर्व मजुरांच्या पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर राज्यातील स्थलांतरित मजुरांना शहरी भागात पुन्हा काम मिळेलच याची शाश्वती नही.

राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याअंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रयेक प्रौढ व्यक्ती वर्षभरात कमीत कमी ५० दिवसांचे काम मिळविण्यास पात्र आहे. सोबतच, लॉकडाऊन काळामध्ये केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अजून जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

युवक काँग्रेस मनरेगा अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन कामगारांच्या काही समस्या असल्यास सोडवणार आहे. सोबतच नवीन कामगारांना जॉब कार्ड मिळवून देऊन त्यांना रोजगार मिळवून देणार आहे.

कोरोना योद्द्यांचा सत्कार

कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, पोलिसखाते आणि पालिकेचे विविध विभागाचे कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचे कोरोनापासून रक्षण केले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवक काँग्रेस राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यामध्ये कोरोना योद्द्यांचा सत्कार युवक काँग्रेस करणार आहे.

वरील तिन्ही कार्यक्रम हे 19 ते 25 जूनदरम्यान सेवा सप्ताहाअंतर्गत राबविण्यात येणार असून गावातील प्रत्येक वार्डात शहरातील प्रत्येक वार्डात याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस मनरेगा अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन कामगारांच्या काही समस्या असल्यास सोडवणार आहे. सोबतच नवीन मजुरांना जॉब कार्ड मिळवून देऊन त्यांना रोजगार मिळवून दिल्याने ठोस मदत होईल, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

महाराष्ट्र

कळंब कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून द्या कळंब तालुका भाजपची मागणी

सलमान मुल्ला कळंब , उस्मानाबाद याबाबत सविस्तर माहिती अशी की मार्च 2020 पासून महाराष्ट्र मध्ये ...
महाराष्ट्र

लहान भाऊ च्या मृत्यू ची बातमी ऐकताच मोठ्या भावाचाही झाला मृत्यू ,

, अमीन शाह , चीपळून  – लहान भावाच्या मृत्यूच्या दु:खामुळे मोठ्या भावानेही जीव सोडल्याची घटना चिपळूणमध्ये ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्र

कळंब नगराध्यक्षाच्या पतीसह उपनगराध्यक्ष यांना कोरोना*

*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला* याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यासह कळंब तालुक्यातील वाढते करण्याचे प्रमाण गेल्या ...
महाराष्ट्र

*राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी श्रीधर भवर*

*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला* गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी ...