
एजास शाह
जळगाव – न्यूज़ 18 न्यूज इंडिया दूरचित्रवाहिनीचे एंकर याने विश्वविख्यात सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती(र.अ.) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून धार्मिक भावना दुखविल्या मुळे कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे अरशी तक़रार मुस्लिम समुदया कडून देण्यात आली.
यांना वरील विषयाचे संदर्भात तक्रार अर्ज खालील मुद्द्यावर येणेप्रमाणे कि, वर नमूद आरोपीन विरुद्ध आपणास तक्रार की, दिनांक 16/ 6/ 2020 रोजी वरील विषयात नमूद आरोपी क्र.1 याने वरील विषयात नमूद आरोपी क्र.2 या प्रख्यात न्यूज चैनल वर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आरोपी क्र. 1 दूरचित्रवाणी अँकर असलेल्या कार्यक्रमात विश्वविख्यात सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती (र. अ. ) यांना “लुटेरा चिस्ती ” असे संबोधून इस्लाम धर्माचे तसेच ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांचे देश-विदेशात असलेल्या कोटी कोटी श्रद्धाळूंची धार्मिक भावना दुखावलेली आहे व त्याचे प्रसारण केलेले आहे.
सदर आरोपी क्र. 1 हा नेहमी एक धर्म विशेष च्या धार्मिक भावना दुखावण्यास कारणीभूत असलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण तो काम करीत असलेल्या आरोपी क्र.2 या दूरचित्रवाहिनी वर करत असतो यापूर्वीही त्याने एक धर्म विशेष च्या एका विशिष्ट वर्गाविषयी उलट सुलट आरोप लावणारे कार्यक्रम आरोपी क्र.2 या दूरचित्रवाणीच्या माध्यमाने केलेली आहे. सदर आरोपी क्र.1व 2 यांच्यावर नमूद प्रकारामुळे एका धर्म विशेष तसेच विश्वविख्यात सुफी संतांचे अपमान करून धार्मिक भावना दुखविलेल्या आहे व त्याचे प्रसारण केलेले आहे. वरील आरोपींच्या या कृत्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सब वरील मुद्द्यांवर मा. साहेबांना विनंती करण्यात येते येणेप्रमाणे की :- 1 आरोपी क्र.1 यांच्यावर भा. दं. सं च्या कलम 153 (अ ), 153 (ब ),295 (अ ), 298, 505, (2) अन्वय गुन्हा दाखल करण्यात यावा.
आरोपी क्र. 1व 2 यांना भविष्यात असे कृत्य करण्यापासून अटकाव करण्यात यावा.
याप्रसंगी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला.तसेच याप्रसंगी सै. अयाज अली , मौलाना जाबीर रझा, रऊफ खान, इलियास नुरी, नाझीम कुरेशी इ. उपस्थित होते.











































