Home विदर्भ पिककर्जाच्या जाचापाई भूमिपुत्राचे अल्लीपुर , वर्धा येथे मुंडन आंदोलन…!

पिककर्जाच्या जाचापाई भूमिपुत्राचे अल्लीपुर , वर्धा येथे मुंडन आंदोलन…!

140

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – ऐन पेरणीचा हंगाम तोंडावर असतांना वर्धा जिल्हातील शेतकरी बँकेच्या व्यवहाराने अतिशय त्रस्त आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे कापूस संकलन केंद्र आणि नाफेडची खरेदी अतिशय मंद गतीने सुरू असून पुढील हंगामात पेरणी करायला पैसा आणावा कुठून हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतांना बँकेच्या विचित्र धोरणाने जिल्हातील शेतकरी अतिशय मेटकुटीला आला आहे.

बियाणे कसे घ्यायचे, लावणं काशी करायची हे यक्ष प्रश्न शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल करतो आहे. दुसरीकडे बँक जीवनावश्यक सेवेत असूनही काही बँकेचे कर्मचारी घरी दडून बसले आहेत. यात मरण शेतकऱ्यांचे होत आहे. या विरोधात आज दुसरे आंदोलन
भूमिपुत्र संघर्ष वाहिनी आणि शिवराय विद्यार्थी संघटने तर्फे वर्धा जिल्हातील अल्लीपुर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेसमोर भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अभिजित दादा फाळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ज्यात शिवराया विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नितीन सेलकर आणि शेतकरी गोपाल मेघरे यांनी बँकेचा निषेध नोंदवत स्वताचे मुंडन करून घेतले. पेरणीच्या तोंडावर ग्रामीण भागातील शेतकरी पिककर्जाचे वाटप न झाल्याने अतिशय त्रस्त असून त्याला न्याय मिळवून देण्याचा हा प्रयत्न समाजातील सर्व घटकांनि सोबत येत केला.

यावेळी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे वर्धा जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थपक अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर, विकास गोठे, मयूर डफ, श्रुनय ढगे, सचिन पारसडे, आकाश घुसे, कैलास घोडे,डॉ.राजेश वाघमारे,गजानन नरड,नाना ढगे, प्रा.प्रवीण काटकर,पंकज इंगोले, शुभम उगेमुगे आणि पीडित शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनाला जनयुवा मंच अध्यक्ष योगेश वरभे,शिवसेना शाखा अल्लीपुर यांनी पाठींबा दिला होता. या प्रसंगी शासनाकडून नायब तहसीलदार श्री पठाण आणि स्टेट बँकचे मॅनेजर श्री. दिनेश पाटील यांनी शेतकऱ्याचे निवेदन घेऊन त्यांना ७ दिवसात नवीन अधिकारी नियुक्त करत पिक कर्ज वाटप पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पिककर्जाला शेतकऱ्यांना अजून त्रास दिला तर अजून तीव्रतेने आंदोलन संपूर्ण जिल्हात करण्यात येईल हा ईशारा भूमिपुत्र संघर्ष वाहिनी तर्फे अभिजीत फाळके पाटील आणि विद्यार्थीमित्र नितीन सेलकर यांनी दिला.