Home महत्वाची बातमी राज्यातील सर्व शाळां , कॉलेज , मेडिकल व पॅरामेडिकल कॉलेजेस यांची वार्षिक...

राज्यातील सर्व शाळां , कॉलेज , मेडिकल व पॅरामेडिकल कॉलेजेस यांची वार्षिक फी 50% कमी करा – अजय मराठे यांची मागणी

203

नाशिक – संपूर्ण राज्यात विविध राजकीय संघटना ह्या गेल्या काही महिन्यांपासून शैक्षणिक आरोग्य विभागातील अंतिमो वर्षांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकीकडे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ परीक्षा घेण्याची तयारी दाखवत असले तरी दुसरीकडे कोरोना आजाराचे महाभयंकर संकट असताना विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी, आरोग्य संरक्षण, व विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी कोण घेणार ? असे गंभीर , नाकारता न येणारे प्रश्न उपस्थित असताना आता शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ या वर्षाकरिता राज्यातील सर्व संस्था चालकांनी संपूर्ण वर्षाची पूर्ण फी ही कुठल्याही प्रकारची सवलत न देता मुलांच्या पालकांना भरण्यास सांगितली आहे व ती न भरल्यास प्रवेश नाकारण्यात येत आहे. हे चित्र संपूर्ण राज्यात दिसतंय.त्याअनुषंगाने राज्यातील सर्व पालकांचा सध्या परिस्थितीचा विचार करून युनायटेड नर्सेस असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय मराठे यांनी राज्यातील सर्व शाळा ,कॉलेज, मेडिकल व पॅरामेडिकल कॉलेज यांच्या फी मध्ये राज्य शासनाने सन 2020-2021 या सत्रासाठी वार्षिक फी मध्ये 50% सवलत द्यावी अशी मागणी युनायटेड नर्सेस असोसिएशन चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय भास्कर मराठे यांनी केली आहे.

खरे पाहता सर्व शाळा ह्या रेग्युलर न करता सध्या च्या स्थितीला ऑनलाईन शिक्षण पद्धती राज्य सरकार राबवत असताना आम्हा पालकांचा घरचा अतिरिक्त खर्च जसे की इलेट्रीरीसीटी,लॅपटॉप, पी सी, इंटरनेट आदी बाबींचा अवाढव्य खर्च हा पालकांना सहन करावा लागणार व या कोरोना महामारीच्या काळात कुठलाही कामधंदा नसल्या कारणाने आम्हा पालकांची सध्या स्थितीला उपास मारीची वेळ आली आहे. त्यात पण सरकारने जर बनवलेला कायद्या नुसार देखील पण काही ठिकाणी गेले २-३ महिने पगार नाही तर काही ठिकाणी पगार कपातीचे प्रश्न आढळून आले आहेत.

दुसरे असे की संस्थाचालकांचा ऑनलाइन पद्धती मुळे इतर बराच खर्च की जसे की इलेक्ट्रिसिटी बिल,मेंटेनन्स खर्च, कॉम्प्युटर लॅब, केमिकल लॅब, प्रोजेक्टर/प्रेझेन्टेशन लॅब व इतर काही खर्च हा ६०% पेक्षा कमी होणार आहे व इतर सुपरविझन,रिव्हिजन,करेक्शन करणे व इतर कामाचा व्याप देखील कमी होणार आहे. तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त क्रिया (Extra-Curricular Activity), मैदानी खेळ, वार्षिक सहल, औद्योगिक भेट,वार्षिक महाविद्यालयीन कार्ये आणि दिवस ( Annual Functions & College Days) व इतर बाबी होणार नसल्या कारणाने देखील राज्यातील सर्व शाळा कॉलेज व नर्सिंग कॉलेज मधील आकारण्यात येणारी वार्षिक फी ही कमी करून 50% वर आणावी. कारण संपूर्ण देशाला कोरोना आजाराच्या महामारीने ग्रासले असताना बर्याच कंपन्या व व्यवसाय बंद पडल्यामुळे बर्याच लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे . इतर सामान्य लोकांना कामधंदे देखील नसल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही पालकांना आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवणावश्यक गरजा सुद्धा पूर्ण करणे देखील कठीण झालेले आहे.
लॉकडाऊन मुळे पालकांवर अशी परिस्थिती ओढवलेली असताना बर्याच शाळा, कॉलेज, मेडिकल व पॅरामेडिकल कॉलेजस च्या ट्रस्टी व मॅनेजमेंट ने या वर्षांची परिस्थिती लक्षात घेता शैक्षणिक वर्ष सन २०२०-२०२१ या वर्षासाठी काय उपाय योजना करता येतील यावर विचार करणे गरजेचे आहे.
आम्ही संस्था चालक, ट्रस्टी, मॅनेजमेंट च्या विरोधात नसून सदर बाब लक्षात घेता की ही बर्याच पालकांना ही जीव-घेणी परिस्तिथी भेडसावत असताना राज्यातील सर्व पालकांनि अशी मागणी केली आहे की देशात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ओढवलेल्या परिस्थिती चा विचार करून राज्य शासनाने सर्व शाळा, कॉलेज, नर्सिंग कॉलेज,मेडिकल व पॅरामेडिकल कॉलेजेस च्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक फी मध्ये ५०% सूट देऊन सर्व पालकांना दिलासा द्यावा व गोरगरीब विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्यापासून वाचवावे ही विनंती.
सदर बाबीचा राज्य शासनाने सकारात्मक विचार करून आपली योग्य ती भूमिका घेऊन राज्यातील सर्व पालकांना न्याय द्यावा या आशयाचे निवेदन युनायटेड नर्सेस असोसिएशन,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय भास्कर मराठे यांनी नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिले.

निवेदनावर युनायटेड नर्सेस असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय भास्कर मराठे,गोकुळ शेळके,अविनाश पवार,विशाल जगताप,निखिल केदार,हेमंत पवार ,निखिल वानखेडे,अश्विनी कदम,स्नेहल तायडे आदींच्या साक्षरी आहेत.