Home विदर्भ लॉक डाऊन च्या काळात शालेय फी साठी पालकांना त्रास दिल्यास मनसे घेणार...

लॉक डाऊन च्या काळात शालेय फी साठी पालकांना त्रास दिल्यास मनसे घेणार त्या शाळेचा समाचार – मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

48
0

मुख्यमंत्र्यांना या वर्षीच्या सत्राची फी सरसकट माफ करावी – मनसे ची मागणी…

यवतमाळ – जिल्ह्यात कोरानाचा प्रकोप पाहता लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे रोजगार तसेच उद्योगधंदे गेल्या 3 महिन्यापासुन सतत बंद अवस्थेत होते. अशा परीस्थीतीत त्यांना त्यांच्या पाल्याची शाळेची फी (शिक्षण शुल्क) भरणे अतिशय कठीण असे झाले आहे. परंतू अशाही परीस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश शाळेने शाळेच्या फी साठी पालकांना फोन करून फी भरण्यासाठी बंधनकारक करत असल्याच्या तक्रारी मनसे ला प्राप्त झाल्या आहेत.या विषयाची गंभीर दखल घेत मनसेचे अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अश्या शिक्षण संस्थांवर कार्यवाही ची मागणी करत पालकांना फी साठी त्रास दिल्यास मनसेच्या पद्धतीने त्या शाळेचा समाचार घेऊ असा सज्जड इशारा दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश समाज हा मध्यमवर्गीय व रोजंदारीवर आपली उपजीवीका भागविणारा समाज आहे. अशा परीस्थितीत यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील नामांकीत शाळेंनी १० ते ३० हजार एवढी अवास्तव फी आकारुन पालकांना आपण जर तात्काळ फी न भरल्यास आपल्या पाल्याची शाळेतील नोंदणी रद्द करण्यात येईल तसेच काही शाळेंनी तर फी न भरल्यास ऑनलाइन वर्गाला विद्यार्थांना बसु न देण्याची धमकीच दिल्याच्या तक्रारी मनसे ला आल्या आहेत. अशा परिस्थितीत या सर्व विषयाची गंभीर दखल घेत आज देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्रयांना पालकांना फी भरण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या शाळेंच्या विरोधात कडक कार्यवाही करीत त्यांची मान्यता रद्द करुन संवेदनहीन झालेल्या शिक्षण सम्राटांविरोधात आपत्ती अधिनियम कायद्या अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवावा तसेच ज्या शाळा विद्यार्थांच्या पुस्तके गणवेष या गोष्‍टींसाठी पालकांवर दबाव निर्माण करत असेल त्यांच्या विरोधातही कडक कार्यवाहीची मागणी अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी केली . शासन स्तरावर राज्य शासनाच्या वतीने राज्यातील उद्योग धंदे, रोजगाराची परीस्थिती पाहता या वर्षाचे संपूर्ण शिक्षण फी माफ करुन अवास्तव फी आकारणाऱ्या शिक्षण संस्थांवर राज्य शासनाने कडक कार्यवाही करावी अशी मागणी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना करण्यात आली.

या उपरही जर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांनी पालकांना फी च्या पैशासाठी अनावश्यक त्रास दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पध्दतीने त्या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शाळा प्रशासन जबाबदार राहील असा सज्जड इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच ज्या पालकांना अश्या त्रासाला सहन करावे लागत आहे त्यांनी मनसे कडे तक्रार नोंदवावी असे आवाहन मनसेच्या वतीने देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting