रवि माळवी
यवतमाळ – आर्णी येथे पकडलेल्या दारुच्या गुन्ह्यात आरोपी नाकारण्याकरीता लोकसेवक अधिकारी व कर्मचारी हे खाजगी इसम यांचे मार्फत लच मागत असल्याची लेखी तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, यवतमाळ येथे दिनांक ३.४.२०२० रोजी दिली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक ४.४.२०२० रोजी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष तक्रादार यांना योगेश काठोळे (खाजगी इसम) यांनी पोलीस स्टेशन आर्णी येथे पकडलेल्या दारुच्या गुन्ह्यात आरोपी नाकारण्याकरीता संबंधीत लोकसेवक यांना स्वत:जवळील १ लाख ३० हजार रुपये लाच रक्कम दिल्याचे सांगीतले असून योगेश कठाळे (खाजगी इसम) यांनी शासकीय विश्राम गृह, आर्णी येथे तक्रारदार यांना १ लाख ३० हजार रुपये लाचेची मागणी केली व लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. परंतु योगेश काठोळे (खाजगी इसम) यांना तक्रारदार यांचेवर संशय आल्याने लाच रक्कम स्विकारली नाही. आरोपी योगेश भगवान काठोळे, (खाजगी इसम) ४० वर्ष, व्यवसाय ठेकेदार रा.गुरुकुंज वसाहत यवतमाळ रोड फॉरेस्ट ऑफीस समोर आर्णी ता.आर्णी जिल्हा यवतमाळ हे फरार असून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. पुढील तपास चालू आहे.
सदरची कार्यवाही अॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक डोंगरदिवे, पोलीस उपअधिक्षक राजेश मुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, अॅन्टीकरप्शन ब्युरो यवतमाळ आणी कर्मचारी सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली.

Post Views: 611