Home महत्वाची बातमी ५ जून २०२० अनोखे ब्लॅक फ्रायडे आंदोलन…!

५ जून २०२० अनोखे ब्लॅक फ्रायडे आंदोलन…!

32
0

वर्धा जिल्हातील युनाइटेड नर्सस एसोसिएशन ने ब्लक फ्रायडे आंदोलन…!!

राज्यातील नर्सेस चा आवाज राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड चे व युनायटेड नर्सेस असोसिएशनचे अनोखे ब्लॅक फ्रायडे आंदोलन.

राज्यातील नर्सेस चा आवाज राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र व युनायटेड नर्सेस असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली अनोखे ब्लॅक फ्रायडे आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न झाले. आज इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रीय संस्कृती जपत महाराष्ट्रातील सर्व नर्सिंग ऑफिसर वर्ग एकत्र येऊन शांत-बध पद्धतीने काम चालू ठेऊन महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले. हे आंदोलन शांत-बध पद्धतीचे होते, कोरोना रोगाची महामारी बरोबरच अन्य रुग्ण सेवा ही कुठली ही निष्काळजी न करता चालूच होती. आज पण स्वतः च्या हक्काची लढाई असताना पण काम चालू ठेऊन आपला धर्म, आपले कर्तव्य पार पाडत, होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठाऊन तोंडाला काळया फती (ब्लाक रिबीन ) लाऊन आपली नैराश्य, आपल्या सोबत होणारी पिळवणूक, हक्का साठी एकत्र येऊन नर्सिंग व्यासायाईकांनी राज्यव्यापी आंदोलन केले. राज्यातील सर्व नर्सेस ने आज शुक्रवार ०५ जून रोजी तोंडाला लावलेल्या आपल्या मास्कला काळ्या फिती लावून फोटो सोशल मीडियावर अपलोड करून शासनाचा राज्यव्यापी निषेध केला.
या मध्ये वर्धा जिल्ह्याच्या UNA अध्यक्ष शुभांगी बोंदाडे व त्याचे सहकारी शूभांगी लोंखडे,उज्वला गोरघाटे, तेजस्विनी घरटे, मंगला पचारे,प्रिंयका पाचखंडे, नंदा गाडगे,स्नेहा धोंगडे, अश्विनी बडगे शिल्पा जिंदे,शितल नाईक बीड जिल्हाचे अनिल जयभाऐ,वर्षा पाईकडे,शुभम काले,सचिन कूसले,मीना पवार आणि महाराष्ट्र तील सगडे UNA चे जिल्हा अध्यक्ष नी सहभागी झाले
त्या आंदोलनाला महाराष्ट्रातील सर्वत्र नर्सेस नि कसलेही निष्काळजी न करता , काम बंद करू शकले असते परंतु तस न करता रुग्ण सेवा सुरू ठेवली, कोणालाही विरोध न करता संभाजी ब्रिगेड च्या हाकेला धावून उत्कृष्ट प्रतिसाद दिला , त्याच बरोबर युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी ही पाठिंबा दर्शवला त्या साठी सर्वांचे आभार.

Unlimited Reseller Hosting