विदर्भ

नाबालिक सात वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून केली हत्या .!

Advertisements
Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – शहरातील तारफैल परिसरात घराच्या बाजूला सात वर्षीय बालक खेळत असताना तारफैल येथीलच 26 वर्षीय संशयीत आरोपीने संध्याकाळी 6 ते 6:30 च्या दरम्यान मृतक बालक आपल्या मित्रांसोबत घराच्या बाजुला खेळत असताना आरोपी ह्याने चॉकलेट, गोळ्या, बिस्कीट देतो म्हणून स्वतःकडे बोलवले व तेथून त्या मुलाला घेऊन गेला. तो निघत असता लोकांनी त्याला विचारपूस केली, त्यावर त्यानी लोकांना सांगितले की तो माझा पुतण्या आहे, अस सांगून तेथून निघून गेला, व मुलावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून, त्याला गळा दाबून ठार मारले आणि पाण्याच्या टाकित अक्षरशः फेकून दिले” असा आरोप त्याचे आई वडील करीत आहेत.
या घटनेने चांगलाच तणाव निर्माण झाल्याने रॅपिड अॅक्शन फोर्सची टीम तैनात करण्यात आली आहे. काल रात्री ७ वाजता ही घटना उघडकीस आली. मृतावस्थेत आढळेलं बालक शेजारच्याच एका युवकासोबत फिरायला गेल्याचे दिसले होते. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी संशयातून त्याला झोडपून काढले. त्यामुळे या संशयित युवकास सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बालकाचा गळा दाबून खून करीत त्याला पाण्याच्या ड्रममध्ये डांबून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संतप्त चारशेवर नागरिकांनी वर्धा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत संताप व्यक्त केला. बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला असून या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात लावण्यात आला या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अपराध क्र. 635/20 व कलम 302, 377, 201, 363, 342 भादवी 6, 10, 12 पोक्सो ऍक्ट दाखल करण्यात आला आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...