Home मराठवाडा जैन संघटना व व्यापारी महासंघ यांच्या वतीने पत्रकार, व्यापारी यांना मोफत औषधीचे...

जैन संघटना व व्यापारी महासंघ यांच्या वतीने पत्रकार, व्यापारी यांना मोफत औषधीचे वाटप

159

लक्ष्मण बिलोरे

जालना / मराठवाडा – कोरोना विषाणूंचा प्रतिकार करण्यासाठी पत्रकार मित्र व व्यापारी बांधव यांच्यात शक्तीवर्धक असे होमिओपॅथिक औषधीचे राजूर येथे जैन संघटना व व्यापारी महासंघ यांच्या वतीने वाटप करण्यात आले . दिवसेंदिवस कोरोना विषाणूंचा विळखा वाढत असून कोरोनासी दोन हात करण्यासाठी व आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध गुणकारी असल्यामुळे जैनसंघटना जालना व व्यापारी महासंघ राजुर यांच्यावतीने राजूर येथील पत्रकार मित्र व व्यापारी बांधव यांना या रोगप्रतिकारशक्‍ती च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हा सचिव जगन्नाथ थोटे, व्यापारी सुंदर विलास काबरा, मुकेश अग्रवाल, सारंगधर बोडके मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार शिवाजी बोर्डे माजी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर पुंगळे, पत्रकार संजय पुंगळे, आदी उपस्थित होते यावेळी गोळ्यांची माहिती देताना जगन्नाथ धोटे यांनी सांगितले की चार गोळ्या मोठ्या माणसांसाठी सकाळी अनुशापोटी व लहान लेकरांना तीन गोळ्या सकाळी या पद्धतीने आठवड्यातून तीन दिवस घेणे अशा या गोळ्या तीन महिने घेणे आहे असे ते म्हणाले..