Home मुंबई पत्रकारांना कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास मिळणार 50 लाखांचे विमा कवच – आरोग्यमंत्री...

पत्रकारांना कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास मिळणार 50 लाखांचे विमा कवच – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा

140

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी जालना

पत्रकाराचा कोरोना व्हायरस ने मृत्यू ओढवल्यास एक कोटींचे विमा संरक्षण मिळावे अशी मागणी राज्य सरकार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रकार संरक्षण समितीने केली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकाराचा जर कोरोनाने मृत्यू झाल्यास ५० लाखांचे विमा कवच देणार असल्याचे जाहीर केले …
त्यामुळे पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले जात आहे.राज्यातील
पत्रकारांचे हित जपणारी संघटना “पत्रकार संरक्षण समितीचे” संस्थापक अध्यक्ष विनोदजी पत्रे सर यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे.पत्रकार संरक्षण समितीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष विनोद पत्रे राज्य अध्यक्ष अनील चौधरी,पुणे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंदरे, तसेच परभणी जिल्हाध्यक्ष अहेमद अन्सारी, जिल्हा सचिव अजहर शेख यांनी पत्रकारांच्या हितासाठी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे यश मिळाले असल्याने पत्रकारांमध्ये कौतुक होत आहे.