Home विदर्भ एक हात मदतीचा उपक्रमातून 70,000 हजार गरजू लोकांना मोफत जेवण वाटणाऱ्या युवा...

एक हात मदतीचा उपक्रमातून 70,000 हजार गरजू लोकांना मोफत जेवण वाटणाऱ्या युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राचे जिल्ह्यात सर्वीकडे होत आहे कौतुक

196

मनिष गुडधे

अमरावती – संपूर्ण जगावर कोरोना महामारी चे संकट उभे आहे, आपल्या देशात सुद्धा कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला. अचानक झालेल्या लॉक डाऊन’ मुळे गोरगरीब सामान्य जनतेला मात्र खूप जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

माणूस आज घरातच बंदिस्त झाल्यामुळे , शेतकरी, कष्टकरी, मजुरी करणारे व ज्यांचे पोट रोजच्या कमाईवर आहे, अशा लोकांवर मात्र अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे, छत्रपती शिवरायांची भूमी आहे, थोर महापुरुषांची भूमी, आहे, आपल्या घरा शेजारी जर कुणी उपाशी असेल, तर रात्रभर आपल्याला झोप लागत नाही, ही आपली संस्कृती आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती जपत युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राच्या वतीने गेल्या 23 मार्च पासून एकात मदतीचा उपक्रम सुरू आहे, या उपक्रमातून आतापर्यंत 70,000 हजार गरीब गरजू लोकांना मोफत जेवण वाटप करण्यात आले. हा उपक्रम तब्बल शंभर दिवसांचा असून, पुढे सुद्धा तीस दिवस असाच निरंतर सुरु राहणार आहे. युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र च्या “एक हात मदतीचा” उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वीकडे कौतुक होत आहे,. हा उपक्रम शंभर दिवस निरंतर आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी,. युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष: श्री. पै. योगेश भाऊ गुडधे. मुख्य संघटक तथा प्रवक्ता: मा. रोहित दादा मोहोड. मुख्य मार्गदर्शक तथा सल्लागार: मा.संजय भाऊ चूनकीकर. रोशन भाऊ पिटेकर, सचिन भाऊ छापाणी, मिलिंद भाऊ वर्धे, रोशन भाऊ जीरे, स्वप्निल भाऊ तायडे, सचिन भाऊ तोंडे, शैलेश भाऊ नागपूरकर, प्रवीण भाऊ गजभिये, गौरव भाऊ धाकडे, शुभम भाऊ राऊत, आकाश भाऊ गवई, देवानंद भाऊ पवार, सद्दाम हुसेन, सम्राट भाऊ नगराळे, पवन भाऊ हिवराळे, व युवा लॉयन्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सहकारी मित्र या गोरगरीब गरजू लोकांना पोटभर जेवण मिळावे यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहेत.