Home मराठवाडा टेंभुर्णी नजीक आळंद येथे विज पडून तरुण शेतकरी ठार

टेंभुर्णी नजीक आळंद येथे विज पडून तरुण शेतकरी ठार

25
0

लक्ष्मण बिलोरे

जालना – आज रविवारी सायंकाळी नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळली , विजेचा लोळ इतका जोरदार होता की जालना जिल्ह्यातील टेंभूर्णी नजीक असलेल्या आंळद येथे गट क्रमांक ३४ मधे भेंडी च्या लागवड साठी मलचिंग चे काम करत असलेला तरुण शेतकरी प्रभाकर सूर्यभान गायकवाड़ हा वीजेच्या जबरदस्त धक्क्याने शेतातच होरपळला. प्रभाकरला तातडीने टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी प्रभाकरला तपासून मयत झाल्याचे घोषीत केले. मयत प्रभाकर गायकवाड या तरुण शेतकऱ्याच्या निधनाची बातमी गांवभर वाऱ्यासारखी पसरली आणि गावांत शोककळा पसरलीय. सगळे गांव दुःखात बुडाले.प्रभाकर गायकवाड या तरुण शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगी,पत्नी ,आई, वडील, आजी, आजोबा , दोन भाऊ असा मोठा परिवार असून त्याच्या निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे.
त्यांची ही बातमी समजताच राजेश चव्हाण ,उद्धव दूनगहु, राजू गायकवाड़ यांनी गांवाकड़े जाऊंन त्यांना तातडीने टेंभुर्णी कड़े धाव घेतली. या प्रकरणी ठाणे अमलदार किरण निर्मळ, गजानन गायकवाड़ ,जगदाळे हे तपास करत आहे.

Unlimited Reseller Hosting