Home मराठवाडा तहसिलदार संतोष बनकर यांच्या आदेशाने 65 ब्रास वाळू साठा जप्त ,

तहसिलदार संतोष बनकर यांच्या आदेशाने 65 ब्रास वाळू साठा जप्त ,

22
0

सय्यद नजाकत ,

बदनापूर, (प्रतिनिधी)

तालुक्यातील वरूडी येथील लहुकी नदीकिनारी ग्राम पंचायतने क्रीडांगणासाठी दिलेल्या जागेशेजारी लहुकी नदी पात्रातून प्रचंड वाळू उपसा करण्यात येत असल्याबाबत गावातील ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर तहसीलदार संतोष बनकर यांनी तातडीने कारवाईचे आदेश देताच तलाठी अजित चव्हाण यांनी पंचनामा करून जवळपास 65 ब्रास वाळू जप्त करून ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली.

बदनापूर तालुक्यातील वरूडी येथे ग्राम पंचायतने लहुकी नदीच्या किनाऱ्यालगत असलेली एक जागा क्रीडांगणासाठी राखीव ठेवलेली होती. मात्र मागील काही दिवसांपासून वाळू माफियांची नजर या क्रीडांगणावर पडली त्यांनी या ठिकाणची वाळू काढण्याचा प्रयत्न केला असता वरूडी गावकऱ्यांनी याचा विरोध करून क्रीडांगणावर अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर प्रभारी तहसीलदार संतोष बनकर यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना तात्काळ कारवाई करण्याची सूचना दिली असता मंडळ अधिकारी लक्ष्मण करकुंभे यांच्यासह तलाठी अजित चव्हाण व इतर महसूल अधिकाऱ्यांनी बुधवार 27 मार्च रोजी या ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांसह क्रिडांगणाजवळील नदी किनारी अवैध उत्खनन करून नदी पात्राजवळीच क्रिडांगणावर चार ढिगे आढळून आले. या ढिगांचे मोजमाप केली असता जवळपास ही वाळू 65 ब्रास असल्याचे दिसून आले.

यावेळी हा साठा जप्त करून ग्रामपंचायतचे सरपंच संध्या भिसे व गा्रम पंचायत शिपाई देवगिर श्रीराम गिरी यांच्या ताब्यात ताबा पावती देऊन हस्तातंरीत करण्यात आला. यावेळी सावळाहरी बाबासाहेब शिंदे, अंकुश रामकिशन शिंदे, गजानन सोमीनाथ शिंदे, बद्री रंगनाथ शिंदे, राधाकिसन भाऊराव शिंदे, दिगांबर छबूराव शिंदे, इद्रीस पठाण, देवगिर श्रीराम गिरी आदींच्या पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या आहेत. तालुक्यात वाळू माफियांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत असून वरूडी येथील क्रीडांगण थेट उत्खनन करून नष्ट करण्याचा प्रयत्न वरुडी गावातील तरुणांच्या सतर्कतेमुळे फोल ठरला

Unlimited Reseller Hosting