Home मुंबई राज्यातील महा-आघाडी सरकारच्या वतीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी मा...

राज्यातील महा-आघाडी सरकारच्या वतीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी मा जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

27
0

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई , दि.२८ :- भारतात जर कुठे उत्तम काम झालं असेल तर ते मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल आहे.

WHO बोलले होते की १.५ लाख केसेस होतील परंतु आमच्या अंदाजाने फक्त ६० हजार केसेस असतील हे महाराष्ट्र सरकारचे उत्तम काम आहे.

माझे जनतेला पत्रकांराच्या माध्यमातून विनंती आहे की घाबरण्याचे काही कारण नाही.
केंद्राने भाकीत केलेल्या रुग्णाच्या संख्येपेक्षा कमी संख्या महाराष्ट्रात आहे.

६६ लाख सर्वेक्षण केलेल आहे. ५ लाख ६७ हजार लोक कोरनटाईन आहेत.

गुजरातपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती ही उत्तम आहे.

७२ लॅब मधून रोज १३ हजार चाचण्या केल्या जात आहेत.

रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग १४ दिवसां वर गेला आहे.

कोरोणाच्या वाढीवर महाराष्ट्र सरकारने नियंत्रण मिळवलेला आहे.

राज्यात फक्त ३५ हजार १५८ रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात १०० लॅब सुरू करणार आहोत.

देवेंद्रफडणवीस यांचे त्यांच्या पक्षावर खूप प्रेम आहे.

७ लाख परप्रांतीय मजूर हे त्यांच्या राज्यात महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री निधी खर्चाने गेले आहेत.

भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू ?

#१३ लाख १३ हजार मास्क आले. आणि ppe kit मिळालेले नाही , व्हेंटिलेटर आणि बेड देखील मिळाले नाहीत.

#जेवढे वैद्यकीय साहित्य केंद्राकडून मागवले तेवढे मिळालेले नाही.

#देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण न करता अशा वेळेस सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

#केंद्र सरकारने अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची मदत करायची आहे परंतु हे कर्ज घेण्याची भाषा करत आहेत.

#कोविड मुळे शेतकरी त्रस्त आहे.

# फडणवीस तुमचं वागणं महाराष्ट्र सरकार विसरणार नाही.
#महाराष्ट्रातला तरूण पुन्हा उद्योग चालू करेल.

#कर्ज देताना वेग वेगळ्या अटी घालू नये.

#मुंबई महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्याची तुलना होऊ शकत नाही.

#महाराष्ट्राचे अनुकरण देशातील इतर राज्य करत आहेत असे हि त्यांनी यावेळी नमुद केले.

Unlimited Reseller Hosting