मराठवाडा

बदनापूर येथे दोन लाख रुपयांचा गुटखा साठा पोलिसांनी जाळून केला नष्ठ ,

Advertisements
Advertisements

सय्यद नजाकत ,

बदनापूर, दि. 27 (प्रतिनिधी): पोलिस ठाण्याअंतर्गत लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बदनापूर पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जवळपास 2 लक्ष रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला होता. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंचासमक्ष हा सर्व गुटखा बुधवारी येथील पंचायत समिती परिसरातील गायरान जमिनीत नष्ट करण्यात आला.

कोरेाना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान गुटखा माफियांनी तोंड वर काढून मोठया प्रमाणात गुटखाची तस्करी सुरू होती. मात्र पोलिसांनीही कडक कारवाइर्‍ करत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत मोठया प्रमाणात गुटखा जप्त करून आरोपींना अटक करण्यात आलेली होती. गुटख्याचे एकूण 20 ते 25 पोते पोलिस ठाण्याच्या मुददेमाल खोलीत ठेवण्यात आलेले होते. पोलिसांनी कारवाई करण्याकरिता या पोत्यातील गुटख्याचे सॅम्पल काढून प्रयोगशाळेतही पाठवलेले होते. परंतु एवढया मोठया प्रमाणात हा गुटखा पडून असल्यामुळे या बाबत वरिष्ठांना कल्पना देण्यात आली. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी पंचासमक्ष हा गुटखा नष्ट करण्याचे आदेश दिले हेाते.

बुधवार दि. 27 मे रोजी पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख इब्राहिम, कमलाकर अंभोरे, अन्न्‍ व औषधी प्रशासन निरीक्षक वर्षा रोडे, नगर पंचायत कर्मचारी रशीद मौलाना, मिलिंद दाभाडे, विजय पाखरे, पवार यांनी हा सर्व गुटखा बदनापूर येथील पंचायत समिती परिसरातील गायरानात नेऊन पंच म्हणून सामाजिक कार्यकर्ते दलितमित्र सांडू कांबळे, सय्यद रफिक अली श्रीमंत जऱ्हाड, अशोक जऱ्हाड यांच्या उपस्थितीत जाळून नष्ट केला. पोलिस निरीक्षक व अन्न व औषधी निरीक्षक संपूर्ण गुटखा जळून नष्ट होईपर्यंत ठाण मांडून होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

रघुनाथ मुकने यांच्या प्रयत्नातून मुरमा गावात मजुरांना जाॅबकार्ड वितरण

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द येथे रोजगार हमी योजना अंतर्गत ...
मराठवाडा

गोंधळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ पत्रकार रामभाऊ उगले यांचे निधन

जालना‌ – लक्ष्मण बिलोरे मराठवाडा विभागाच्या,जालना जिल्ह्यातील गोंधळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ पत्रकार रामभाऊ हरिभाऊ ...
मराठवाडा

जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

जालना -‌ लक्ष्मण बिलोरे कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ...