Home मराठवाडा जालन्यात सात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण,तर एकाचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

जालन्यात सात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण,तर एकाचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

21
0

*जिल्ह्याची वाटचाल शतकाच्या दिशेने, एकूण रुग्णसंख्या 85*

सय्यद नजाकत ,

जालना ,

*जालना जिल्ह्यात आज बुधवारी सायंकाळी आणखी नवीन आठ संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून आता जालना जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 85 वर पोहचली असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. जालना जिल्हा सरकारी रुग्णालयाने काल मंगळवारी सायंकाळी जालना जिल्ह्यातील 186 संशयीत रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी आज बुधवारी सकाळी जिल्ह्यातील 125 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले होते. त्यामुळे जिल्हा वासीयांना चांगलाच दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा मिळून काही तास उलटत नाही तोच पुन्हा चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. प्रयोग शाळेकडे 186 पैकी प्रलंबित असलेल्या 61 संशयीत रुग्णांचे अहवाल आज बुधवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले आहेत. त्यात जुना जालना भागातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या एका खाजगी रुग्णालयातील आणखी तीन कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच घनसावंगी तालुक्यातील पीर गेबवाडी 1, खापरदेव हिवरा 1, भोकरदन तालुक्यातील चांदइ एक्को 3 याप्रमाणे नवीन 8 पॉझिटिव्ह रूग्णांची जिल्ह्यात भर पडली असून जिल्ह्याची एकूण संख्या 85 वर पोहचल्यामुळे जालना जिल्हा आता शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले*

Unlimited Reseller Hosting