Home मराठवाडा नांदेड येथे आज उमरी तालूक्याती ४ रुग्णांची भर , तर जिल्ह्यातील एकूण...

नांदेड येथे आज उमरी तालूक्याती ४ रुग्णांची भर , तर जिल्ह्यातील एकूण आकडा १३७ वर, दिवसभरात १६रुग्णांना सुट्टी

135

नांदेड , दि २६ :- ( राजेश एन भांगे ) – जिल्ह्यातील मंगळवार दिनांक 26 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 122 अहवाला पैकी 111 अहवाल निगेटिव्ह प्राप्त व नवीन 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 137 एव्हढी झाली आहे.

आता प्राप्त झालेले 4 पॉझिटिव रुग्ण हे उमरी, उमरी तालुका, जिल्हा नांदेड भागातील 4 ही रुग्ण असून यामध्ये 3 स्त्रिया अनुक्रमे वय वर्ष 9, 14, 48, आणि एका 7 वर्षीय बालकाचा समावेश आहे, या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिती आहे.

मंगळवार दिनांक 26 मे 2020 रोजी एनआरआय यात्री निवास covid-19 केअर सेंटर येथील 16 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, त्यामुळे आतापर्यंत 137 पॉझिटिव रुग्णांपैकी 80 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर 51 रुग्णांवर नांदेड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू असून त्यातील दोन स्त्रिया वय वर्ष 52 व 55 यांची प्रकृती गंभीर आहे.

व तसेच आज दिनांक 25 मे 2020 रोजी पाठविण्यात आलेल्या 170 स्वाब तपासणी अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल. व दिनांक 26 मे 2020 रोजी 63 रुग्णांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत, त्यांचे अहवाल देखील उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील असे. नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 4 पॉझिटिव रुग्णांची भर
☑️ दिवसभरात 16 रुग्णांना सुट्टी
☑️ एकूण रुग्ण संख्या 137 वर.
☑️ आत्तापर्यंत 79 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️7 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️62 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ दोन महिला रुग्णांची प्रकृती चिंताजनक.

दरम्यान नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
सदर माहिती २६ मे. सायं५ वा. प्राप्त.