मराठवाडा

माता न तू …वैरीणी…!

Advertisements
Advertisements

लक्ष्मण बिलोरे

जालना , दि. २६ :- जालना जिल्ह्यातील अंबड शहरात काल एका चिमुकल्या बाळाची हत्या झाल्याची खबर प्रसार माध्यमांत प्रसिद्ध झाली आणि सर्वांना धक्का बसला.या निष्पाप जीवाने कुणाचे काय बिघडविले असेल बरं ? असा प्रश्न निर्माण झाला होता.चिमुकल्याला पाण्याच्या टाकित बुडवून मारल्याची बातमी पसरली होती.आपल्या बाळाला कुणीतरी ठार मारल्याची फिर्यादही आईने पोलिसांना दिली होती.परंतु सदरील गुन्ह्याचा तपास अंबड पोलिसांनी लावला असता… आईनेच बाळाची हत्या केली असल्याचे समोर आले आहे.अंबड शहरातील आंबेडकर नगरात तीन वर्षांच्या चिमुकल्यास पाण्याच्या टाकित बुडवून ठार मारल्याची घटना उघडकीस आली होती.त्यानुसार अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या दिशेने अंबड पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता काही तासांतच गुन्ह्याचा तपास लावला.त्या बाळाची हत्या जन्म दात्या आईनेच केल्याचे समोर आले आहे…. पोलिस तपासात मिळालेल्या माहितीनुसार मृत बाळाची आई पायल हिचा विजय जाधव याच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता.तिला सासरची मंडळी घराबाहेर काढून देतील या भीतीने आपण बाळाला ठार मारले असल्याची कबुली पायलने पोलिसांना दिली.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

जालना -‌ लक्ष्मण बिलोरे कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ...
मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...