Home विदर्भ युवा नेते तारिक़ साहिर लोखंडवाला यांच्या वतीने ईद निमित्त गरजुना 700 ड्राईफ्रूट...

युवा नेते तारिक़ साहिर लोखंडवाला यांच्या वतीने ईद निमित्त गरजुना 700 ड्राईफ्रूट किट वाटप…!

46
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. 24 :- तारखेला रमजान ईद साजरी होणार आहे,मात्र सध्या लॉक डाऊन सुरु आहे,देशा मध्ये आपातकालीन स्थिति असल्याने मुस्लिम बांधव घरात राहून साध्या पद्धतीने यंदा ईद साजरी करणार आहे.

लॉकडाऊन व कोरोनामुळे प्रतिबन्धित इंदिरा नगर भागात गरीब व गरजू मुस्लिम नागरिकांची अड़चन पाहता व त्यांना यंदाची रमजान ईद साजरी करण्यासाठी राष्ट्रवादी युवा नेते मो.तारिक साहिर लोखंडवाला यांच्या वतीने गरीब व गरजू मुस्लिम कुटुंबाना सुखामेवा किट वाटप करण्यात आल्या.

ईद मध्ये गोरगरीब गरजू मुस्लिम कुटुंबाना पारंपरिकरित्या ईद करिता बनविन्यात येणाऱ्या “शिरखुरमा”बनविन्यासाठी सामाजिक सेवाभाव म्हणून मोहम्मद तारिक़ साहिर लोखंडवाला यांच्याद्वारे स्वखर्चाने यवतमाळ येथील कोरोनामुळे प्रतिबन्धित भाग इंदिरा नगर भागात 360 व लॉकडाऊन प्रभावित बोरी अरब व लाड़खेड़ येथे राहणाऱ्या 340 असे मिळून 700 डॉयफ्रूट किट गरीब व गरजू मुस्लिम कुटुंबाना ईद करिता वाटप करण्यात आल्या.
कोरोनामुळे लोकड़ाऊन असल्याने दैनंदिन मजूरिवर वर निर्भर असलेल्या इंदिरा नगर,बोरी अरब व लाड़खेड येथील या गरीब मुस्लिम कुटुंबांची आर्थिक परिस्थिति बिकट आहे.या कुटुंबाची यंदाची रमजान ईद साजरी व्हावी यासाठी सेवई , काजू , बदाम , किशमिश , खोपरा,खुरमा,चारोली, डालडा,साखर,चे पैकेट बनवून किट तयार करून ही मदत वाटप करण्यात आली. यासाठी मो.तारिक साहिर लोखण्डवाला यांनी स्वतः व मित्रपरिवारातील सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतली. गरजुना त्यांच्या घरापर्यन्त ह्या सुखामेवा किट पोहोचविल्या गेल्यामुळे गरजू कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान प्रतिबंधित भागा सह शहरातील सर्व भागात नागरिकांनी लॉकडाऊन पर्यंत घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान तारिक साहिर लोखंडवाला यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting