Home विदर्भ बांधकाम झालेल्या लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान द्या – नगरसेवक अमोल आसेकर यांची मागणी

बांधकाम झालेल्या लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान द्या – नगरसेवक अमोल आसेकर यांची मागणी

99

अनुदानाअभावी रखळले घरकूल चे बांधकाम…!

कोरपना – मनोज गोरे

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कोरपना येथे १३७ घरकुल मंजूर झाले आहे, व त्यापैकी अनेक लाभार्थ्यांनी बांधकाम सुद्धा सुरू झाले आहे,परन्तु अनेकांचे बांधकाम स्लाब लेवल होऊन सुध्दा तीन महिने लोटूनही लाभार्थ्यांच्या खात्यात बांधकामाचे अनुदान जमा झाले नाही, त्यामुळे पुढील बांधकाम कसे करायचे अशा प्रश्न लाभार्थ्यांना पडला असून बांधकाम अर्धवट पडले आहे, या करिता बांधकाम झालेल्या लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अमोल आसेकर यांनी केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्यांना सिमेंट विटांचे पक्के घर नाही अशा व्यक्तीना घरकुल मंजूर झाले आहे, परन्तु अगोदर लाभार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने बांधकाम करायचे आहे, त्या नंतर सदर बांधकामाचे बिल सादर केल्या नंतर तीन टप्यात अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते, परन्तु अनुदान देण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने घरकुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे ,तर दुसऱ्या टप्यातील बिल लाभार्थ्यांनी
सादर करून तीन महिन्यांच्या कालावधी लोटला परन्तु अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही.
शहरी भागातील लाभार्थ्यांना २५० लाखाचे घरकुल बांधकाम करीता अनुदान मंजूर करण्यात आहे, या मध्ये केंद्र व राज्य सरकार या दोघांचा वाटा आहे, या वर संपूर्ण नियंत्रण नगर पंचायत आहे. पहिल्या टप्यातील अनुदान देण्यात आले आहे,परन्तु ज्या लाभार्थ्यांचे बांधकाम स्लाब लेव्हल झालेले आहे त्यांना दुसऱ्या टप्यातील अनुदान तीन महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा, लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात जमा झाले नाही, त्यामुडे पुढील बांधकाम ठप्प झाले आहे.
मे महिना शेवट चे दिवस असून काही दिवसंतरच पावसाचे आगमन होणार आहे ,त्यामुळे घरकुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने लाभार्थ्यांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागणार आहे, या करिता बांधकाम झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात तत्काळ अनुदान जमा करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अमोल आसेकर यांनी केली आहे.