Home मराठवाडा भाजपला विपरीत बुद्धी सुचते तरी कशी? – दत्ता वाकसे

भाजपला विपरीत बुद्धी सुचते तरी कशी? – दत्ता वाकसे

37
0

बीड , ( प्रतिनिधी ) – देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोना सारख्या रोगाने थैमान घातलेले असताना विरोधी पक्षातील भाजप नेत्यांना ही वेळ आंदोलनाची नाही तर रस्त्यावर उतरून जनतेला मदत करण्याचे आहे अशा कठीण प्रसंगाचे तुम्हाला गांभीर्य नसून तुम्हाला अशी विपरीत बुद्धी सुचते तरी कशी असा टोला धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे ते म्हणाले की देशावर राज्यावर सध्या कोरोना चे संकट घोंगावत असताना विरोधी पक्षांना आंदोलने सुचते तर कसे? महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगल्या प्रकारे कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात सर्वच स्तरावर चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत त्याला विरोध करण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे परंतु भाजप कोरोनासारख्या रोगाचे राजकारण करत आहे परंतु यामुळे कुठल्याही प्रकारचा सरकारला फरक पडणार नाही त्यामुळे जनतेने ठाकरे सरकारला मदत करावी सामाजिक भूमिकेतून सरकार सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करत आहे त्यामुळे भाजपने कितीही राजकारण केले तरी यामुळे काही फरक पडणार नाही असे देखील दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.

Unlimited Reseller Hosting