Home विदर्भ गोरगरीब मजुरांच्या पोटाची खळगी भरवीनारा राष्ट्रीय महामार्ग ६ वरील ढाबा.

गोरगरीब मजुरांच्या पोटाची खळगी भरवीनारा राष्ट्रीय महामार्ग ६ वरील ढाबा.

23
0

सोमी व रिना भिन्डर यांचा अनोखा उपक्रम.

वर्धा – जिल्हा आष्टी तालुका आज कोरोणा मुळे संपुर्ण देशात व आपल्या महाराष्ट्रा मधे खुपच घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. कारनही तसेच आहे हा जो कोरोना विषाणू आहे हा न दिसणारा विषाणू आहे त्यामूळे प्रत्तेक इसम हा आपल्या जवळच्या माणसा सोबत सुद्धा शंकेच्य नजरेने पाहतो आहे.

तळेगांव शा.पंत हे गाव शामजी पंत महाराजांच्या पावन स्पर्शाने अजरामर झालेले आहे. त्यामूळे येथील नागरिक हे प्रत्तेकाच्या मदती करिता केव्हाही तयार असतात मग ती कशाचिही मदत असो. मुंबई ते नागपुर या राष्ट्रीय महामार्गा 6 वर वसलेल तळेगांव हे गाव व याच मार्गावर असणारे ढाबे. या ढाब्यांमुळे आज जवळ पास दोन महिन्याच्या कालावधी मधे कितीतरी मजुर कोणी पायी तर कोनी मिळेल त्या गाडीने प्रवास करित आहे व ते हजारो किलो मिटरचा प्रवास पायी करित आहे त्यांच्या खंद्यावर असलेले ओझे व त्यांचे लहान लहान मुले बाळे. त्यांच्या कडे ना पाणी नाही जेवनाची कोणतीही सुविधा आणी पैसे असेलही तर होटेल धाबे हे बन्द आहे. पण याला अपवाद आहे.तो तळेगांव पासुन हाकेच्या अंतरावर असलेला आर एस वन हा ढाबा या ढाबा मालकाचे स्वतहचे रहाणेही त्याच ठिकाणावर असल्या मुळे व पायी जाण्यार्या लोकांचे हाल डोळ्याने पाहिल्यामुळे सोंमी भिन्डर व त्यांच्या अर्धंगिणि रिना भिन्डर यांनी ज्या की उच्च विभुशीत आहे. त्यांनी स्वतः पोळ्या लाटून त्या गोर गरिब मजुरांची पोटाची खळगी भरली ती सुदधा कोणताही मोबदला न घेता हेच नाही तर लहान मुलां करिता दुधाची व बिस्किट चि व्यवस्था करुन दिली ते कुटुंब येवढ्यावरच न थांबता मेडिकल मधून औषधा पाण्याची सुदधा व्यवस्था करुन दिली. हा त्यांचा कार्यक्रम जवळपास दोन महिन्या पासुन निरंतर सुरु आहे आणी हे मदत कार्य अविरत चालू असल्यामुळे ह्या दांम्पत्याचे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रविंद्र साखरे सह इकबाल शेख

9890777242 / 9834453404