Home मुंबई ऑटो टॅक्सीवर बंदी, मग आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील?

ऑटो टॅक्सीवर बंदी, मग आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील?

43
0

मुंबई – सुरेश वाघमारे

मुंबईत प्रत्येक क्षणी कायदा बनविला जातो आणि दुसऱ्या सेकंदात दुसरा बदलला जातो. महाराष्ट्र शासनाने कोरोना अंतर्गत जारी दिलेल्या आदेशात ऑटो आणि टॅक्सी वर बंदी घातली आहे. ऑटो टॅक्सीवर बंदी, मग आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील? हा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनिलगलगली यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत रेल्वे, मेट्रो पूर्णपणे बंद आहेत. बेस्ट बसमध्ये सामान्य लोकांवर निर्बंध असतात. अशा परिस्थितीत सरकारने मुंबईतील ऑटो किंवा टॅक्सीवर बंदी घातली आहे जी सर्वसामान्यांसाठी आहे. आज प्रत्येक नागरिकांकडे खासगी मोटारी नसतात असे सांगत अनिल गलगली म्हणाले की, जर एखाद्याला रुग्णालयात जायचे असेल तर सामान्य नागरिकांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत? आपत्कालीन परिस्थितीत सामान्यांसाठी प्रवास करण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
आदेशानुसार नमूद असलेली ऑटो आणि टॅक्सीवरील बंदी हटविण्यात यावी, असा विश्वास अनिल गलगली यांनी व्यक्त केला. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, परिवहनमंत्री एड अनिल परब, मुख्यसचिव अजय मेहता आणि परिवहनआयुक्त शेखर चन्ने यांना पत्र लिहिले आहे.

Unlimited Reseller Hosting