Home मराठवाडा शेतकऱ्यांना कापसाचे पैसे तात्काळ आदा करा अन्यथा रुमण्याचा दणका दाखवू – दत्ता...

शेतकऱ्यांना कापसाचे पैसे तात्काळ आदा करा अन्यथा रुमण्याचा दणका दाखवू – दत्ता वाकसे

101

बीड , दि. २१ ( प्रतिनिधी ) – कोरोना सारख्या रोगाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले आहे त्याच पार्श्वभूमीवर सर्व जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला मानला जातो परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कापूस खरेदी केंद्राने कापूस खरेदी केला परंतु त्याचे पैसे आणखी शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पैसे आदा करा अन्यथा रुमण्याचा दणका दाखवू प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे यांनी केले आहे पुढे ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या सर्व शेतातील मशागती संपले असून त्यांना बी-बियाणे खते खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागतात परंतु कापूस खरेदी केंद्र धारक हे शेतकऱ्यांना गेल्या एक ते दोन महिन्यापासून कापूस खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत याप्रश्नी बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तात्काळ कापूस खरेदी केंद्रावर कारवाई करावी त्याचबरोबर शेतकऱ्यांना खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी तात्काळ त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश कापुस खरेदी केंद्र धारकांना देण्यात यावेत आणि कापूस खरेदी केंद्र धारकांनी शेतकऱ्यांना पैसे न केल्यास आगामी काळात त्यांना शेतकऱ्याच्या रुमण्या चा दणका दाखवण्यात येईल अशाप्रकारे प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना ई-मेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे पुढे म्हणाले की शेतकरी हा अगोदरच मेटाकुटीला आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे कापूस बियाणे बाजरी बियाणे त्याचबरोबर खते खरेदी करण्यासाठी पैशाची चणचण भासत आहे त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर कापूस खरेदी केंद्र धारकांनी तात्काळ पैसे जमा करावेत देखील दिलेले प्रसिद्धी पत्रकाद्वारे वाकसे यांनी म्हटले आहे.