Home मुंबई पोलिसांना औषधे व डॉक्टराना पीपीइ किट व संरक्षणार्थ सामुग्रीचे वाटप

पोलिसांना औषधे व डॉक्टराना पीपीइ किट व संरक्षणार्थ सामुग्रीचे वाटप

156

सुरेश वाघमारे

मुंबई , दि. २१ :- लॉक डाऊनच्या काळात पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल अहोरात्र बंदोबस्त ठेवत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांच्या संरक्षणार्थ कार्यरत असणाऱ्या या पोलिसांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी एमएचबी पोलिसांना संस्थेतर्फे अर्सनिक अल्बम 30 लिक्विडचे वाटप करण्यात आले.

सोईल्स फाऊंडेशनच्या मिता शाह यांच्या सहकार्याने पोलिसांना अर्सेनिक अल्बम 30 लिक्विड वाटप करण्यात आले. तसेच थर्मल गन व ऑक्सिमीटरच्या साह्याने ऑक्सिजन लेव्हल तपासणी करण्याचे प्रशिक्षण पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले. शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे.
त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 मधील लोकांच्या सेवेसाठी कार्यरत असणारे सर्व डॉक्टर्सना मुंबई पालिकेच्या सहकार्याने डॉ. वंदना यांच्यासोबत पीपीइ किट, मास्क , फेस शील्ड, थर्मल गन व पल्स मीटर देण्यात आले. प्रभाग क्रमांक 1 च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी जनतेच्या सेवेसाठी असणाऱ्या पोलीस तसेच डॉक्टर या कोव्हिड योद्धाना संरक्षणार्थ पीपीइ किट सहित अन्य सामग्री देण्याची मागणी केली होती. दरम्यान लॉक डाऊनच्या काळात नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी केले आहे.