Home विदर्भ भेदभाव टाळा मानुसकी पाळा

भेदभाव टाळा मानुसकी पाळा

168

आज एक ग्रेट भेट

सांप्रत एकीकडे कोरोना काळात कोणीही कुणाची मदत करावी या मानसीकतेत नाही, पण प्रत्येकच व्यक्तीला कोरोनाच असेल असेही नाही. आपण कुठेतरी मानुसकीही जपायला हवी. कशासाठी हा भेदभाव? सामाजात वावरत असताना आपलही काही समाजासाठी देन असतं. आनी हे का विसरता…

भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे.

भेदभाव टाळून आपत्कालीन परिस्थितीत सोशल डेस्टिनेशन पाळून आपण कोणाच्या संकटात मदत करण्याची मानसिकता ठेवणे आवश्यक आहे.

महेश हनवंते – वडकी

यवतमाळ – आज दि. १७/५/२०२० रोजी वडकी समोरील बोरी नॅशनल हायवे रोड वर एक्सीडेंट झालाय असा कॉल मला हिंगणघाटचे मित्र आनंदभाऊचा ११ वाजता च्या दरम्यान आला व मला त्यांनी माहिती दिली त्याच क्षणी मी गेलो व बोरी (ई.) येथील उड्डाणपूल वर झालेली घटना पाहून थांबलो. चार चाकी गाडीचे समोरील दोन्ही टायर बसले होते व कैची रॉड टूटलेला होता. गाडी डीवायडरच्या कडेला लागुन होती. सुदैवाने गाडी चालवत असलेले बांधव ह्यांना काहीच हानी झालेली नव्हती व ते एकटेच गाडीत त्यांच्या गावी गोंदिया जिल्ह्यात जात होते. त्यांची विचारपूस केली त्यांचे प्रतीक अग्रवाल साहेब मेडीसीन सायंटिस्ट, हैद्राबाद ला राहतात व लॉक डाऊन मुळे गावी अडकलेली त्यांची फॅमीली आणण्या करिता हैद्राबाद ते गोंदिया जात होते. लखलखती उन्हं अंगावरून जात होती. त्यांना गाडी लॉक करून घेण्यास सांगितले व मी त्यांना वडकी येथील माझ्या ऑफीस मध्ये आनले त्यांच्यासाठी सुविधा व व्यवस्था केली नागपूर वरून त्यांनी गाडी बोलावून घेतली व आम्ही एकमेकांचा मो.नं. घेतला व त्यांनी यापुढेही संपर्कात राहूया असे सांगून गावी परतले.
यात त्यांनी व मीही डेस्टिनेशन चे पालन केले. सायंटिस्ट व्यक्ती बोलायला मनमिळावू व्यक्तीमत्व‌‌‌. आज एक अश्या माध्यमातून ग्रेट भेट झाली व सायंटिस्ट अग्रवाल साहेब यांच्यासी मैत्री झाली.