Home मराठवाडा यवतमाळ जिल्ह्यातील तीघे जण इंडिका कारने पुण्याकडे जात असतांना बदनापूर जवळ अपघात...

यवतमाळ जिल्ह्यातील तीघे जण इंडिका कारने पुण्याकडे जात असतांना बदनापूर जवळ अपघात एक जागीच ठार दोन गंभीर ,

22
0

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड तालुक्यातील भंनडोला येथील तिघे जण इंडिका कारने पुण्याकडे कडे जात असतांना बदनापूर जवळ अपघात होऊन एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना उपचारासाठी औरंगाबाद शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले

यवतमाळ जिल्ह्यातील उंबरखेड तालुक्यातील भांडोला येथील शेख इम्रान,विजय गोविंद जाधव व देवानंद जाधव हे तिघे जण 16 मे रोजी रात्री शिंहगड पुणे कडे जाण्यासाठी इंडिका कार क्रमांक एम एच 12 एम ई 2283 ने निघाले असता पहाटे 2:30 ते 2:45 दरमयन जालना मार्ग बदनापूर जवळ पोहचले मात्र पहाटे चालकास झोप येत असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार वरुडी शिवारात डाव्या बाजूला खड्डयात जाऊन एका झाडाला धडकल्याने कार मधील इम्रान शेख हा जागीच मरण पावला तर विजय जाधव व देवानंद जाधव हे गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एम बी खेडकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमाळे ,बीट जमादार नितीन धीलपे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना औरंगाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले व घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई केली

Unlimited Reseller Hosting