Home विदर्भ पीक कर्जासाठी सहज उपलब्द न होणारे दस्तऐवज वगळण्यात यावे -विद्यार्थीमित्र नितीन सेलकर...

पीक कर्जासाठी सहज उपलब्द न होणारे दस्तऐवज वगळण्यात यावे -विद्यार्थीमित्र नितीन सेलकर यांची मागणी.!

114

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्फत मुख्यमंत्री याना व्हाट्स अँप्स द्वारे पाठविले निवेदन.

वर्धा – मागील काही महिन्यांपासून देशातच नाही तर जगात कोरोनाने थैमान घातले असल्याने देशात संचारबंदी लागू झालेली आहेत. मात्र या संचारबंदीत सुद्धा जगाचा पोशिंदा हा राब-राब राबुन देशातील लोकांच्या पोटांची खळगी भरत आहे. अशात लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार असून खरीप हंगामा साठी पेरणी करिता बी-बियाणे,खते, औषधाची व्यवस्था करण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसे उरलेले नाही. तर दुसरीकडे संचारबंदी च्या जाचक अटीमुळे मागील वर्षीचा शेतमाल विकण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्याच्या घरी पडला आहे. अशातच शेतकऱ्यांना पीक कर्जाची नितांत गरज असून त्यासाठी लागणारे हैसियत प्रमाणपत्र,चतुरसीमा,नकाशा, फेरफार पंजी, अशा सहज उपलब्ध न होणाऱ्या दस्तऐवजाची मागणी बँक कर्मचारी करत असून वरील दस्तऐवजाची पूर्तता करणे सामान्य शेतकऱ्याच्या आटोक्यात नसल्याने अशा जाचक अटी व नियम वगळून शेतकऱ्यांना सात बारा, आठ अ, नोडयु या सहज उपलब्ध होण्याऱ्या दस्तऐवजावर यावर्षी तरी पीक कर्ज उपलब्ध करून वितरित करावे.बँके कडे मागील वर्षी आधीच सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज उचलते वेळी सर्व दस्तऐवज दिलेले आहे तरी अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांचा होईल ईतक्या लवकर निर्णय घेऊन प्रश्न सोडवावा अशी मागणी शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर यांनी व्हाट्स अप्स द्वारे वर्धा जिल्हाधिकारी यांचेसह पालकमंत्री,कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांना केली आहे.