
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही
रवि माळवी
यवतमाळ , दि. १६ :- पुसद येथील शेतातील बाभळीचे झाडाखाली आरोपी हे तिन पत्ती हा हारजीत जुगाराचा खेळ खेळत असतांना यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून चार जणांना अटक केली असून सात आरोपी तेथून पळून गेले. पोलीसांनी ही कारवाई दिनांक १४ मे रोजी केली.
समीरउल्ला खान बिस्मील्लाखान (३४) रा.खतीब वार्ड, मस्तान चौक, पुसद, अयुबनजर खान आगा खान (४५) रा.जामा मस्जीद जवळ माळीपुरा पुसद, अन्सार खान सत्तार खान (४९) रा. गडीवार्ड पुसद, शेख नैमोदिन शेख नुरोदिन (४६) रा.गुजरी चौक पुसद असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनांक १४ मे रोजी आरोपी अमनउल्ला खान समिउल्ला खान हा इंदीरानगर पठाणवाडी परिसरातील गफार कुरेशी याचे शेतात असलेल्या बाभळीचे झाडाखाली काही ईसमांसह तिन पत्ती हा हारजीतचा जुगार खेळ खेळवित होता याबाबत यवतमाळ येथील गुन्हे शखेचे पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार हे पथकासह अवैध धंद्यावर कार्यवाही करणे करीता पुसद मुख्यालयी हजर असतांना त्यांना ही गोपनिय माहिती मिळाली असता तेथे धाड टाकून चार आरोपींना अटक केली व सात आरोपी हे पोलीसांना येतांना पाहुन तेथून पळून गेले. मोक्यावर मिळुन आलेल्या आरोपीतांचे ताब्यातुन विविध कंपनीचे ६ मोबाईल, नगदी ११ हजार ५०० रुपये गंजीपत्ते व ईतर साहित्य असा एकुण ३७ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच नमुद आरोपीतांकडे पळुन गेलेल्या ईतर आरोपींबाबत पंचासमक्ष विचवारपुस केली असता त्यांचेसोबत हारजितचा पत्ता जुगार खेळ खेळणारे अजून सात आरोपी अमन उल्ला खान समिउल्ला खान रा.गडी वार्ड, पुसद, पवन रामधन राठोड रा.शिवाजी वार्ड पुसद, मोहंमद आदिल उर्फ गुटली मोहंमद सलाम रा.खतीबवार्ड पुसद, शेख रफीक उर्फ गारशा शेख नुर रा.कानडे लेआऊट वसंतनगर पुसद, शेख इस्त्राईल शेख मुनीर रा. वेणी ता.पुसद, शेहराज खान सरफराज खान रा.गडी वार्ड पुसद, संजय कनिराम बनचरे रा.नवीन पुसद हे असल्याचे सांगीतले. वरील सर्व आरोपींविरुध्द पुसद शहर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पुसद शहर पोलीस स्टेशनकडून सुरु आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस हवालदार गोपाल वास्टर, मुन्ना आडे, गजानन डोंगरे, पंकज पातुरकर, उल्हास कुरकुटे, मो.ताज, किशोर झेंडेकर, नागेश वास्टर सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.













































