Home उत्तर महाराष्ट्र लॉकडाऊन” मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना जबर मारहाण करणाऱ्या १५ ते २० जणांविरुद्ध...

लॉकडाऊन” मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना जबर मारहाण करणाऱ्या १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

21
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

वाहन अडवल्याचा जाब विचारत नाशिक जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना 15 ते 20 जणांच्या टोळक्याने लाथा बुक्क्यांनी, दगडाने जबर मारहाण केली. ही दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील आमोदे चेक पोस्ट येथे घडली. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा (कोविड – 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमोदे चेकपोस्ट येथे पोलीस नाईक अनिल दादाेजी शेरेकर, पोलीस शिपाई बागुल, जिल्हा परिषदचे शिक्षक 10 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी करून कर्तव्य बजावत होते. त्यावेळी जळगाव जिल्ह्याच्या रहिवाशांचे वाहन चेकपोस्ट येथे पोना शेरेकर व पोशि बागुल यांनी अडवले. त्यावेळी 15 ते 20 जणांच्या टोळक्यांनी पेलिसांसोबत हुज्जत घालत लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली.
या प्रकरणी 11 मे रोजी पहाटेच्या सुमारास नांदगाव पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. 253/2020) भादंवि कलम 353, 332, 324, 143, 147, 149, 188, 269, 270 नुसार सायगावचे (बागळी) पोलीस पाटील आबा दादा शिंदे, पत्रकार गोकुळ मंडळ, युवराज शिंदे, धोंडिराम कुट्टीवाला यांचा मुलगा, दत्तू माळी, सुनील विठोबा आहेर याचा मुलगा यांच्यासह 10 ते 15 जणांच्या टोळक्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची माहिती समजताच उपविभागीय अधिकारी समरसिंह साळवे, नांदगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोली निरीक्षक दीपक सुरवडकर, पोलीस उपनिरीक्षक पी. बी. दळवी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Unlimited Reseller Hosting