Home विदर्भ जनता कर्फ्यूच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल अमरावतीकरांचे आभार…

जनता कर्फ्यूच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल अमरावतीकरांचे आभार…

30
0

आ. सुलभाताई खोडके यांनी केले जिल्हाधीकारी व पोलीस आयुक्त यांचे अभिनंदन…

मनिष गुडधे

अमरावती , दि. ११ – कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी गेल्या ४ मे ते १७ मे पर्यंत तिसऱ्या टप्पातील लॉक डाउन पाळल्या जात आहे. कोरोनाच्या महामारीला निपटण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला असल्याने अमरावती चे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणी प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व धुरा आपल्या हाती घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार अमरावतीत लॉकडाउन व संचारबंदीचे कसोशीने पालन केले जात आहे. त्यामुळे कोरोना सारख्या वैश्विक महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी चांगले प्रयत्न होतांना दिसत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाला हरविण्यासाठी जोमात कामाला लागली आहे. बेघर निवारा केंद्र, कम्युनिटी किचन, कोरोना तपासणी केंद्र, विलगीकरण सेंटर, अशा अनेक उपाययोजना कोरोना संकट काळात महत्वपूर्ण ठरू पाहत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी प्रत्येक बाबींवर गांभीर्याने लक्ष देत असून आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत त्यांनी सर्व उपाय योजनांची सतर्कतापूर्वक व सुरक्षात्मकरित्या प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु केली आहे.
अमरावतीमधील कोरोनाची वर्तमान स्थिती पाहता दोन दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला. शनिवार दुपारी ३ वाजता पासून सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला होता, सर्व अमरावतीकरांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या जनता कर्फ्यूचे पालन केले. या दरम्यान नागरिकांनी घरातच राहून व कुठल्याही प्रकारची गर्दी न करता, प्रशासनाला सहकार्य केले. कोरोना संकट काळात अमरावतीकर सतर्क व सावध राहून जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे मनोधैर्य वाढवत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी अमरावतीकर जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसाद व सहकार्याबद्दल अमरावतीचे आमदार सुलभाताई खोडके यांनी अमरावतीकर नागरिकांचे आभार मानले आहे. पुढेही अमरावतीकरांचे असेच सहकार्य अपेक्षित असून त्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवून साथ देण्याचे आवाहन देखील केले आहे. अमरावतीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पुरेपूर अंमलबजावणी होत असून एक लोकप्रतिनिधी म्हणून आ. सुलभाताई खोडके यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्याची भूमिका ठेवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन मुळे अनेक विद्यार्थी, पालक, खाजगी कर्मचारी, कामगार व मजूर हे अन्य राज्यात व इतर जिल्ह्यात अडकून पडले आहे. तसेच परप्रांतातील व इतर ठिकाणचे नागरिक सुद्धा अमरावतीत अडकले आहे. त्यांना स्वगृही पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासन व अमरावती पोलीस विभागाने परवानगी व पासेस बाबतची कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे अनेक जण विशेष रेल्वे गाडीने व खाजगी बसेसने रवाना झाले आहेत. अमरावतीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अंमलबजावणी करून कोरोनाला प्रतिबंध घालण्यास प्रयत्नांची मालिका चालविल्याबद्दल अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे अभिनंदन केले आहे. तसेच संचारबंदी अंतर्गत शहरी क्षेत्रात चोख बंदोबस्त बजावून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दक्ष असणारे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व त्यांचे पोलीस अधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या कामगिरीची आ.सुलभाताई खोडके यांनी प्रशंसा करीत अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.हरिबालाजी एन. व त्यांचे अधिकारी व सर्व पोलीस कर्मचारी हे सुद्धा ग्रामीण भागात अहोरात्र तत्पर राहून संचारबंदीच्या कायद्याचे पालन करीत आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल देखील अभिमान बाळगून आ.सुलभाताई खोडके यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Unlimited Reseller Hosting