मुंबई

कष्टकऱ्यांचे लाईट बिल माफ करा – आ. विनोद निकोले

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या कडे मागणी

मुंबई / डहाणू , दि. १० (विशेष प्रतिनिधी) – हातावरचे पोट असलेल्या कष्टकऱ्यांचे लाईट बिल माफ करा अशी मागणी माकप चे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी महाराष्ट्र राज्य ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या कडे ईमेलद्वारे मागणी केली आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, संपूर्ण जगभरात तसेच देशासहित राज्यात कोरोना कोविड-19 विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूशी मुकाबला करण्यासाठी आपण सर्वजण एकनिष्ठेने प्रयत्न करत आहोत. दि. 22 मार्च “जनता कर्फ्यु”च्या लॉकडाऊन नंतर श्रमिक जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णतः बंद झाले आहेत. नागरिक कसेबसे उत्पन्नातून बचत केलेल्या पैशावर आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. अन्न धान्य घेऊन आपली भूक भागवत आहेत. यात लॉकडाऊन मध्ये संपूर्ण परिवार चा परिवार घरातच आहे. त्यात उन्हाळाचा ऋतु असल्याने साहजिकच विजेचा वापर वाढलेला असेल. त्यामुळे विजेचे येणारे देयक (वीज बील) हे नक्कीच वाढलेले असेल. हे येणारे वीज बिल ₹ 1000 ते 5000 च्या घरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी वीज बिल भरावे की, आपली दैनंदिन भूक मिटवावी? आज लॉकडाऊन होऊन जवळजवळ 2 महिने पूर्ण होत आले आहेत. आज मी डहाणू विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे. डहाणू हे पालघर जिल्ह्यात येते. हा संपूर्ण भाग हा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासीची आर्थिक परिस्थिती एकदम बिकट असते. त्यामुळे आदिवासी समाजाचे वीज देयक माफ करणे अत्यंत आवश्यक आहे.

शेतकरी वर्गाच्या शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने व शेतमजुरांना रोजगार नसल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला कामगारवर्गाचे हातावर पोट असल्याने पगार मिळत नाही आहे. स्थलांतरित मजुरांची दैन्यवस्था आपण रोज पाहतच आहोत. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने कामगार वर्ग अतिशय चिंतेत सापडला आहे. अशात प्रत्येक कुटुंब प्रमुखाच्या व्यथेचा आपण अंदाज घेऊ शकतो. त्या दृष्टिकोणातून नागरिकांना धीर देण्यासाठी वीज देयक (लाईट बील) माफ करणे अत्यावश्यक आहे. तसेच आदिवासी समाजा सहित शेतमजूर, शेतकरी आणि कामगार वर्गाचे कोरोनाच्या पाश्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन काळातील वीज देयक (लाईट बिल) माफ करावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा क्षेत्राचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी लेखी निवेदनाद्वारे ईमेल मार्फत महाराष्ट्र राज्य ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

यावेळी माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखाना, डहाणू शहर सचिव कॉ. धनेश अक्रे, कॉ. रशीद पेंटर, कॉ. महेंद्र दवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

मुंबई

सिद्धी टेलिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरजित सिंग यांच्या नावावरुन फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट

लियाकत शाह मुंबई – शिवानी शर्मा नावाच्या महिलेने सिद्धी टेलिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरजित सिंग ...
मुंबई

फाईट फॉर राईट फाउंडेशन ने केली अदानी इलेक्ट्रीसिटी च्या वीज बिलांची होळी…!

मुंबई – सुरेश वाघमारे लॉकडाऊन दरम्यान अन्यायकारक वीजबिले पाठवून जनतेची पिळवणूक करणाऱ्या अदानी इलेक्ट्रीसिटी विरुद्ध ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *