Home मराठवाडा बदनापूर येथे सुरू असलेल्या 9 दुकानावर दंडात्मक कार्यवाही ,

बदनापूर येथे सुरू असलेल्या 9 दुकानावर दंडात्मक कार्यवाही ,

171

सय्यद नजाकत

बदनापूर (प्रतिनिधी)
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून आपत्ती निवारण कायद्यातंर्गत संपूर्ण जिल्हयात जिवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद असतानाही काही व्यापारी दुकाने उघडत असल्यामुळे नगर पंचायत व पोलिसांनी संयुक्त कार्यवाही सुरू केली असून मागील काही दिवसांपासून अशा दुकानांवर कारवाई करण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे शनिवारी 9 दुकानांवर थेट कारवाई करत ७ हजार दंड वसूल केला असून यानंतर हेच दुकान उघडे सापडले तर त्यांच्यावर थेट गुन्हा नोंद करून दुकान सील करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी दिली आहे.विशेष म्हणजे एका कापड दुकानदारावर तीन दिवसात दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे
कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव वाढू नये म्हणून जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी संपूर्ण जिल्हयात जमावबंदी आदेश लागू करून जिवनावश्यक वस्तू विक्री तसेच फळ, भाजीपाला विक्री करणारी दुकाने वगळता सवर् दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही बदनापूर शहरातील काही दुकानदार या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे दिसून आले होते. यापूर्वीही विना मास्क फिरणाऱ्यांवर व दुकाने उघडणाऱ्यांवर शुक्रवारी नगर पंचायतने दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतरही काही दुकाने उघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायत व बदनापूर पोलिस स्टेशनने पथक तयार करण्यात आले असून जिल्हाधिकारी जालना यांच्या आदेशानुसार बदनापूर नगर पंचायत कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव होऊ नये यासाठी गैरकृत्य करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित केलेले होते. त्या अनुषंगाने सार्वजनिकस्थळी थुंकण्यास बंदी असून चेहऱ्यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सींग पाळणे आदी बाबींचे पालन व्हावे म्हणून हे पथक काम पाहणार आहे या पथकात पोलीस निरीक्षक मारोती खेडकर व मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनखाली जिवन साबळे, जालींदर साबळे, अशोक बोकन, मिलिंद दाभाडे, संदीप साबळे, रशीद पठाण, दिपक दाभाडे, दस्तीगिर सय्य्द, विजय पाखरे, लक्ष्मण पवार या नगर पंचायत अधिकारी कर्मचाऱ्यांची तर आय. बी. शेख, चरणसिंग बम्हणावत या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या पथकाने शनिवारी पोलिस निरीक्षक मारोती खेडकर, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, अभियंता गणेश ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात थेट कारवाई करत बेकायदेशीररीत्या दुकाने उघडून व्यवसाय करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. या अंतर्गत निरंकारी फॅशन 1500 रुपये दंड, मातोश्री कापड दुकान 1000 रुपये दंड, साई फर्निचर 1000 रुपये दंड, शेख अजहर यांचे दुकान 500 रुपये दंड, सिददीक कुरेशी 1000 रुपये दंड, सददाम कुरेशी 1000 रुपये दंड, मिलन कलेक्शन 1000 रुपये दंड, तर दोन जणांवर सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या बाबत नगर पंचायत्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी सांगितले की जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आपत्ती निवारण कायद्यातंर्गत दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून असे दुकाने उघडणे बेकायदेशीर आहे. पहिल्यांदा या दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असून या पुढे दुसऱ्यांदा अशी दुकाने उघडी दिसली तर दंड आकारून थेट फौजदारी गुन्हे या दुकानदारांविरूध्द दाखल करून हे दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येईल अशी तंबी या दुकानदारांना दिली आहे.
लॉक डाऊन सुरु झाल्यापासून जीवनावश्यक वस्तूंची दुखणे वगळता इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश असतांना देखील बदनापूर शहरातील काही किराणा दुकानदार तर मुभा दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकाने उघडून विक्री करीत आहे तर अन्य काही व्यवसायिक जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन करून दुकाने उघडत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन रस्त्यावर गर्दी होत आहे त्यामुळे पोलीस व नगर पंचायत प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून अश्या दुकानदाराविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे विशेष म्हणजे दंडात्मक कारवाई करून देखील काही महाभाग वारंवार दुकाने उघडून लॉक डाऊन नियमांचे भंग करीत असल्याचे दिसत आहे
============
एम बी खेडकर -पोलीस निरीक्षक
जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार बदनापूर पोलिसांच्या हद्दीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वैधकीय व कृषी सेवा वगळून सकाळी ७ ते २ सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे मात्र ज्या दुकांना परवानगी नाही असे दुकानदार दुकाने सुरु ठेवत असल्याने जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होत असल्याने अश्या दुकानदाराविरुद्ध दंतमक कारवाईसह गुन्हे दाखल केले जाणार आहे